Sanjay Mishra: बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे फेसबूक अकाउंट हॅक!

Sanjay Mishra: बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे फेसबूक अकाउंट हॅक!

Sanjay Mishra: बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते संजय मिश्रा त्यांच्या मस्त स्टाइलसाठी ओळखले जातात. छोट्या छोट्या भूमिकांमधून त्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.

'ऑफिस-ऑफिस'मधील 'शुक्ला'चे पात्र असो किंवा 'धमाल'मधील 'बाबूभाई'ची भूमिका किंवा 'आँखो देखी'मधील 'राजेश बाउजी'ची भुमिका त्यांनी मोठ्या पडद्यावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतेल आहे. मात्र आज संजय मिश्रा वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत.

Sanjay Mishra: बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे फेसबूक अकाउंट हॅक!
Bharat Jadhav: "मुंबईत घर घ्यायला हिंमत लागते", भरत जाधव यांच्या नवीन नाटकाचा अस्वस्थ करणारा प्रोमो भेटीला

त्याच झालं असं की, संजय मिश्रा यांच्या पत्नी किरण मिश्रा यांचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले आहे. त्यामुळे मिश्रा यांना अनेक समस्या येत आहे.

इतकच नाही तर त्याचे सोशल मिडिया अकाउंट हॅक करुन त्यावर हॅकर पोस्टही शेयर करत आहेत. मिश्रा यांनी हॅक झालेल्या अकाऊंटवरून अपलोड करण्यात आलेल्या पोस्टचे काही स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.

Sanjay Mishra: बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे फेसबूक अकाउंट हॅक!
Raveena Tondon : 'बॉलीवूडपेक्षा टॉलीवूड नेहमीच सरस, ते नेहमीच....' ! रविनानं दिली सणसणीत प्रतिक्रिया

सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत त्यांनी लिहिले की, 'माझ्या पत्नीचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहेत. कृपया त्यांच्याकडून आलेल्या कोणत्याही संदेशांना रिप्लाय करु नका. मेटा कृपया मदत करा.'

किरण या संजय मिश्रा यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांनी 2009 मध्ये किरणसोबत लग्न केले होते.

Sanjay Mishra: बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे फेसबूक अकाउंट हॅक!
Karan Veer Mehra Divorced:"आम्ही कधीच वेगळे झालोय..", दोन वर्षातच अभिनेता करण वीर मेहराचा घटस्फोट! दुसरे लग्नही मोडले

आता त्यांची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. सध्या अनेक सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंटवरही हॅकर्सची नजर आहे. यापुर्वी देखील अनेक कलाकारांची सोशल मिडिया अकाउंट हॅक करण्यात आली आहेत.

काहीच दिवसांपुर्वी साउथ स्टार प्रभासचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आले होते. ज्यानंतर त्याच्या सर्व पोस्ट डिलिट करण्यात आल्या होत्या नंतर त्या रिकव्हर करण्यात आल्या.

त्याचबरोबर तिग्मांशू धुलिया, ईशा देओल, शाहिद कपूर, तब्बू आणि जॉन अब्राहम या बॉलिवूड कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंट देखील हॅक झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com