esakal | 'शट अप या कुणाल' कार्यक्रमात रंगणार '' सामना''
sakal

बोलून बातमी शोधा

kunal, kamara, show, now, sanjay raut, will be, participated in kunals show

स्टँड अप कॉमेडियन म्हणून ओळख असणा-या कुणालच्या शो चा देशभरातच नव्हे तर जगात मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत. आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यावरुन कुणालला अनेकदा वादाला सामोरे जावे लागले आहे. कुणालने आपल्या या कार्यक्रमात 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.

'शट अप या कुणाल' कार्यक्रमात रंगणार '' सामना''

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई: एकापेक्षा एक सरस अशा मार्मिक विशेषणांनी सरकारवर टीका करणा-या, गल्ली पासून ते दिल्ली पर्यत सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावणा-या विषयांवर प्रशासनाला आपल्या खास शैलीत कानपिचक्या देणा-या कुणाल कामराच्या शो चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्टँड अप कॉमेडियन म्हणून ओळख असणा-या कुणालच्या शो चा देशभरातच नव्हे तर जगात मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत. आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यावरुन कुणालला अनेकदा वादाला सामोरे जावे लागले आहे. कुणालने आपल्या या कार्यक्रमात 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे त्याने राऊत यांना मुलाखत घेण्यासाठी  कामरा यानं निमंत्रण पाठवलं होतं. आता संजय राऊत यांनी देखील कुणालचं निमंत्रण स्वीकारलं असून कुणालसोबत त्यांनी फोनवर या शोसंदर्भात बातचीत केली आहे. येत्या रविवारी खारमधील स्टुडिओत ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्ट मुलाखतीचं चित्रीकरण पार पडणार असल्याची माहिती आहे.

काही दिवसांपूर्वी ट्विट करून कुणालनं संजय राऊत यांनी त्याच्या शोमध्ये सहभागी व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. 'संजय राऊत सरांनी शटअप या कुणाल या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी ते पुन्हा सुरु करेन, अन्यथा शक्यता कमी आहे, असं ट्विट कुणाल कामरानं केलं होतं. संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार असल्याचं जाहीर केल्यापासून राज्यात ही एकच चर्चा रंगत आहे.

दैनिक सामनाच्या मुलाखतीसाठी नुकतीच राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांच्यात तब्बल दोन ते तीन तास चर्चा रंगली होती. राऊत-फडणवीस यांच्या या भेटीनंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतरच, कुणाल कामरानं संजय राऊत यांची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळं सर्वानीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.

काही महिन्यांपूर्वी इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात कुणालने पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी घातलेल्या वादामुळे इंडिगो एअरलाइन्स, एअर इंडिया, स्पाइस जेट या विमान कंपन्यांनी त्याच्यावर बंदी घातली होती. कुणालने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आपल्या शो मध्ये येण्यासाठी निमंत्रण दिले होते.  मात्र राज यांनी  कुणालचे निमंत्रण स्विकारलं नव्हतं.