विक्रम गोखले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत

Ambedkar - The Legend
Ambedkar - The Legendesakal
Summary

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर ही सीरिज आधारीत आहे.

तामिळ सुपरस्टार सूर्याचा ‘जय भीम’ (Jai Bhim Film) हा चित्रपट 2 नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आता आणखी एक 'सीरिज' प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जीवनावर आधारीत एक सीरिज लवकरच येणार आहे. ही सीरिज ‘बाबा प्ले’ या ओटीटी प्लॅटफॉर्मरवर प्रदर्शित होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर ही सीरिज आधारीत आहे. या सीरिजचं नावं ‘आंबेडकर- द लेजेंड’ (Ambedkar - The Legend) असं असून या सीरिजमध्ये अभिनेता विक्रम गोखले (Actor Vikram Gokhale) मुख्य भूमिका साकारणार आहेत. ‘बाबा प्ले’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्तानं सीरिजचा ट्रेलर 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या सीरिजची कथा, निर्मिती आणि दिग्दर्शन संजिव जैसवालनं (Sanjeev Jaiswal) केलीय. संजिवचे फरेब, शुद्र-द रायझिंग, अनवर हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. ‘कोटा- द रिझर्वेझन्स’ या चित्रपटानंतर आता आंबेडकरांवर आधारीत असलेली ही सीरिज आपल्या भेटीला लवकरच येणार आहे.

Ambedkar - The Legend
नोटांवर असणाऱ्या 'या' रेषांचा अर्थ माहितीय? का असतात जाणून घ्या

आयएमडीबी (www.imdb.com) चित्रपट, टीव्ही शो आणि प्रसिद्ध व्यक्तींच्याबाबत माहिती मिळवण्याच्या जगातील लोकप्रिय स्त्रोत आहे. IMDB नं २०२१ च्या टॉप रेटेड चित्रपटांची यादी जारी केलीय. यामध्ये दक्षिणेचा सुपरस्टार सूर्या (Superstar Surya) याचा चित्रपट 'जय भीम' (Jai Bhim) हा टॉपवर आहे. IMDB चा चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर जय भीम, त्यानंतर शेरशाह, सूर्यवंशी, मास्टर, सरदार उधम, मिमी, कर्णन, शिद्दत, दृश्यम 2, हसीन दिलरुबा या चित्रपटांचा समावेश करण्यात आलाय.

Ambedkar - The Legend
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये गुंतवा फक्त 'इतके' रुपये, मिळतील 35 लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com