'पिंकीचा विजय असो' मालिकेत संरक्षण कऱ्हाडेच्या भावाची लक्षवेधी भूमिका | Adhokshaj Karhade | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adhokshaj Karhade

'पिंकीचा विजय असो' मालिकेत संरक्षण कऱ्हाडेच्या भावाची लक्षवेधी भूमिका

स्टार प्रवाह वाहिनीवर ३१ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ‘पिंकीचा विजय असो’ (Pinki Cha Vijay Aso) या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेत अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ अधोक्षज कऱ्हाडे (Adhokshaj Karhade) लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत तो बंटी हे पात्र साकारणार असून या भूमिकासाठी तो खूपच उत्सुक आहे. बंटी हा पिंकीचा अगदी जवळचा मित्र.. पहिल्यांदा मैत्री आणि कालांतराने एकतर्फी प्रेम करणारा मस्तमौला तरुण आहे.

या अनोख्या भूमिकेविषयी सांगताना अधोक्षज म्हणाला, "बंटी हे अतिशय कलरफुल पात्र आहे. आमची पटकथा लेखिका श्वेता पेंडसेने खूप उत्तमरित्या ते मला समजावलं आहे. पिंकीवर मनापासून प्रेम करणारा आणि सतत तिच्यासाठी धडपडणारा असा हा बंटी. मालिकेची टीम खूप भन्नाट आहे. त्यामुळे काम करताना मजा येतेय. आम्ही साताऱ्यातल्या एका गावात काम करतोय. त्यामुळे प्रेक्षकांचाही छान प्रतिसाद मिळतोय. स्टार प्रवाहसोबत याआधी छोटी मालकीण आणि लक्ष्य या मालिकांमध्ये मी काम केलं आहे. त्यामुळे बंटी साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असेल."

हेही वाचा: नव्या मालिकेत दिसणार स्वप्नील जोशी-शिल्पा तुळस्करची जोडी

आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. खाईन तर तुपाशी अशा ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. तिच्या राहण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवतं. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे मालिकेतून पाहायला मिळेल. ही नवी मालिका ३१ जानेवारीपासून रात्री ११ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Sankarshan Karhades Brother Adhokshaj Karhade To Play A Role In Pinki Cha Vijay Aso

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top