
चर्चा तर होणारच!
अभिनयासोबतच आपल्या नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चर्चेमागचं कारण म्हणजे संस्कृतीने नुकताच केलेला फोटोशूट. हा साधासुधा फोटोशूट नसून वेडिंग फोटोशूट आहे आणि यामध्ये तिच्यासोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा भाऊ अतुल कुलकर्णी पाहायला मिळतोय. संस्कृती आणि अतुलचं हे खास फोटोशूट पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
'रॉयल वेडिंग कलेक्शन २०२१' असं लिहित संस्कृतीने हे फोटो पोस्ट केले आहेत. त्याचसोबत तिने कॅप्शनमध्ये हेसुद्धा स्पष्ट केलंय की, हे फक्त शूट आहे, माझा साखरपुडा झालेला नाही आणि लग्न करण्याचा सध्या विचारसुद्धा नाही. एका फॅशन ब्रँडसाठी संस्कृती आणि अतुलने हे फोटोशूट आहे. नेटकऱ्यांना या दोघांची जोडी फारच आवडली असून या फोटोशूटवर लाइक्सचा वर्षाव होतोय. महालात हे फोटोशूट करण्यात आलं असून यामध्ये संस्कृतीने लेहंगा परिधान केला आहे तर अतुलने शेरवानी, शाल आणि फेटा परिधान केला आहे. या फोटोंवर सोनाली कुलकर्णीनेही 'गोड' अशी कमेंट केली आहे.
हेही वाचा : अभिज्ञानंतर आता मितालीच्या मंगळसूत्राची सोशल मीडियावर चर्चा
संस्कृती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि विविध फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. ती लवकरच '८ दोन ७५' या चित्रपटात झळकणार असून राजकीय विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. यामध्ये संस्कृतीसोबतच संजय मोने, आनंद इंगळे, विजय पटवर्धन, शुभंकर तावडे हे कलाकारसुद्धा झळकरणार आहेत.