
Shivkumar Sharma: प्रख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचं निधन
प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं आज निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे. संतूरवादनासोबतच ते एक उत्तम गायकही होते. संतूर या वाद्याला लोकप्रियता मिळवून देण्याचं श्रेय हे शर्मा यांनाच जातं. त्यांच्या मागे त्यांची पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहे. (Pandit Shivkumar Sharma Passed Away)
शर्मा यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma) यांना १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९१ मध्ये पद्मश्री तर २००१मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यासोबतच त्यांना १९८५ मध्ये बाल्टिमोर या संयुक्त राज्याचं मानद नागरिकत्वही प्रदान करण्यात आलं आहे.
शिवकुमार शर्मा यांनी १९६७ साली बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित बृजभूषण काबरा यांच्यासोबत केलेला अल्बम 'कॉल ऑफ द व्हॅली' हा शास्त्रीय संगीतातला एक प्रसिद्ध अल्बम आहे. चित्रपटसृष्टीत त्यांनी १९८० साली सिलसिला या चित्रपटापासून सुरुवात केली. पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबत अनेकवेळा संगीत दिल्यामुळे या जोडीला शिव-हरी या नावाने प्रसिद्धी मिळाली.
Web Title: Santoor Player Pandit Shivkumar Sharma Passed Away
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..