अखेर या 'क्यूट कपल'ने दिली प्रेमाची कबूली!

वृत्तसंस्था
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये साराने कार्तिकसोबत कॉफी डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून या दोघांची चर्चा सुरू झाली. कार्तिक आणि सारा लवकरच एकत्र चित्रपटात झळकणार आहेत. ‘लव आज कल 2’मध्ये या जोडीची आॅनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

सैफ अली खान आणि अमृता सिंग याची मुलगी अभिनेत्री सारा अली खान हिच्या प्रेमाचा अखेर उलगाडा झालाय. अभिनेता कार्तिक आर्यन याच्यासोबत सारा डेट करत असून तिच्या वाढदिवशी त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. 

सारा आणि कार्तिक बऱ्याचदा एकत्र दिसले, मात्र त्यांनी त्यांचे रिलेशनशिप लपवून ठेवले होते. अखेर साराच्या वाढदिवशी कार्तिकने तिच्यासोबत सेलिब्रेशनचा फोटो पोस्ट केला आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला.  

Happy Birthday Princess @saraalikhan95 And Eid Mubarak (this time without the mask )

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

सारा व कार्तिक दोघांनीही थायलंडमध्ये हे सेलिब्रेशन केले. 'प्रिन्सेसला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि ईद मुबारक (पण यावेळी कोणत्याही मास्कशिवाय)', असे हा फोटो शेअर करताना कार्तिकने लिहिले. त्यांनी यापूर्वी तोंडाला रूमाल बांधून एक फोटो शेअर केला होता. 

Eid Mubarak

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये साराने कार्तिकसोबत कॉफी डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून या दोघांची चर्चा सुरू झाली. कार्तिक आणि सारा लवकरच एकत्र चित्रपटात झळकणार आहेत. ‘लव आज कल 2’मध्ये या जोडीची आॅनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sara Ali Khan and Karthik Aryan are in relationship