सारा अली खानची कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा झाली पूर्ण!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मार्च 2019

  • 'लव आज कल'चा येतोय सिक्वेल
  • सारा आणि कार्तिक प्रथमच शेअर करतील स्क्रिन
  • साराने व्यक्त केली होती कार्तिकला डेट करण्याची इच्छा
     

अभिनेत्री सारा अली खान हिच्या बॉलिवूड क्रशबद्दल आतापर्यंत सगळ्या जगाला कळले आहे. बॉलिवूडचा नवा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन तिला किती आवडतो हे तिने स्वतःच कबूल केले आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटात या यंग जोडीला एकत्र काम करण्याची संधीही मिळाली आहे. दिल्ली येथे नुकताच आटोपलेल्या या चित्रपटाच्या शूटींग निमित्ताने केलेल्या पार्टीचा व्हिडीओ बघितला तर सारा आणि आर्यन यांच्यातील केमिस्ट्री ही त्यांच्या फॅन्सना ट्रिटच ठरेल.

सारा आणि कार्तिक 'लव आज कल 2' या चित्रपटातून पहिल्यांदाच मोठी स्क्रिन शेअर करणार आहेत. चित्रपटाच्या शूटींगचा काही भाग दिल्लीत शूट केला गेला. दिल्लीतील शूटींग संपले असून चित्रपटाच्या टिमने येथून निघण्यापूर्वी सेलिब्रेशन केले. या व्हिडीओत सारा आणि कार्तिक मस्ती करताना दिसत आहेत. सारा जोरजोरात कार्तिकचे नाव घेऊन ओरडत आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

अभिनेत्री सारा अली खान हिच्या बॉलिवूड क्रशबद्दल आतापर्यंत सगळ्या जगाला कळले आहे. बॉलिवूडचा नवा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन तिला किती आवडतो हे तिने स्वतःच कबूल केले आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटात या यंग जोडीला एकत्र काम करण्याची संधीही मिळाली आहे. दिल्ली येथे नुकताच आटोपलेल्या या चित्रपटाच्या शूटींग निमित्ताने केलेल्या पार्टीचा व्हिडीओ बघितला तर सारा आणि आर्यन यांच्यातील केमिस्ट्री ही त्यांच्या फॅन्सना ट्रिटच ठरेल... . . . . . . . #Bollywood #BollywoodLife #Love #Friendship #Celebration #UpcomingMovie @saraalikhan95 @kartikaaryan @imtiazaliofficial

A post shared by SakalMedia (@sakalmedia) on

 

 

काही दिवसांपूर्वी सारा आणि कार्तिक चा दुचाकीवर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. करण जोहरच्या कॉफी विथ करण शो मध्ये सारा अली खानने हजेरी लावली होती. तेव्हा तिने कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. साराने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवरुन कार्तिक सोबतचा तिचा चित्रपटातील एका सीन चा फोटोही शेअर केला होता. त्या फोटोवरुन तरी हा चित्रपट म्हणजे लव स्टोरी असणार आहे हे दिसून येत आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यात जरी नाही तरी पडद्यावर सारा अली खानची कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा झाली पूर्ण झाली असल्याचे म्हणता येईल.

सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांचा 'लव आज कल' या चित्रपटाचा सिक्वेल इम्तियाज अली घेऊन येत आहे. ज्यात सारा आणि कार्तिक प्रमुख भूमिकेत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sara Ali Khan and Kartik Aryans video of movie wrap up is gone viral on social media