कार्तिकसोबत सारा अली खान पोहोचली हॉस्पिटलमध्ये, का?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 August 2019

मागच्या काही काळापासून कार्तिक आर्यन आणि सारा खूप चर्चेत आहेत. पहिल्यांदा ‘कॉफी विथ करण’ चॅट शोमध्ये कार्तिक आर्यन आपला क्रश असल्याचं सांगत त्याला डेट करण्याची इच्छा व्यक्त केल्यापासून सारा खूप चर्चेत आली होती

मुंबई : खुप कमी कालावधीत आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे सारा अली खान होय. ती कायमच मिडियासाठी चर्चेचा विषय असते. मागच्या काही काळापासून कार्तिक आर्यन आणि सारा खूप चर्चेत आहेत. पहिल्यांदा ‘कॉफी विथ करण’ चॅट शोमध्ये कार्तिक आर्यन आपला क्रश असल्याचं सांगत त्याला डेट करण्याची इच्छा व्यक्त केल्यापासून सारा खूप चर्चेत आली होती. 

त्यानंतर अनेक इव्हेंटमध्येही सारानं या गोष्टीचा उल्लेख केला होता आणि अचानक एका नाइट इव्हेंटमध्ये अभिनेता रणवीर सिंहने या दोघांची भेट घडवून आणली आणि त्यांच्या लिंकअपच्या चर्चा सुरु झाल्या. सध्या तर अनेक ठिकाणी हे दोघंही एकत्र दिसतात. नुकतंच सारा आणि कार्तिकला मुंबईमध्येच एका हॉस्पिटल बाहेर स्पॉट करण्यात आलं. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनला एका हॉस्पिटलबाहेर पाहण्यात आलं. त्यामुळे त्याबद्दल वेगवेगळे अंदाज लावले जात होते मात्र याचा खुलासा आता झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून कार्तिकच्या वडील हॉस्पिटमध्ये अ‍ॅडमिट आहेत. त्यांना भेटण्यासाठीच सारा कार्तिकसोबत हॉस्पिटलमध्ये गेली होती. मात्र कार्तिकच्या वडीलांना हॉस्पिटमध्ये का अ‍ॅडमिट करण्यात आलं याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sara Ali Khan arrives in hospital with Kartik, why?