थरारक! मेकअप करताना सारा अली खानच्या चेहऱ्याजवळ फुटला बल्ब;पहा व्हिडीओ Sara Ali Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sara Ali Khan

थरारक! मेकअप करताना सारा अली खानच्या चेहऱ्याजवळ फुटला बल्ब;पहा व्हिडीओ

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान(Sara Ali Khan) नेहमीच्या तिच्या फ्लर्टी स्टाईलसाठी ओळखली जाते. साराची फॅन फॉलॉइंग खूप वाढली आहे. काही दिवसांपूर्वी साराच्या नाकावर जखम झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा साराच्या सिनेमाच्या सेटवरील मेकअप रुममध्ये तिच्यासोबत एक अपघाताचा प्रसंग ओढवला आहे. मेकअप रुममध्ये टचअप करत असताना तिच्या चेहऱ्याजवळ बल्ब फुटला आहे. याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. साराने तिच्या ट्वीटर अकाऊंटवरनं यासंदर्भात ही माहिती दिली आहे.

सारा ही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतंच सारा अली खानने तिच्या मेकअप रुममधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. सिनेमाच्या सेटवर मेकअपरुममध्ये हा अपघात झाला आहे. ज्यामुळे सारा खूपच घाबरली होती. खरंतर सारा अली खान मेकअपरुम मध्ये टचअप घेत होती आणि तेव्हाच तिच्या चेहऱ्याजवळचा बल्ब अचानक फुटला.त्यावेळी घाबरलेल्या साराचा चेहरा पाहण्यासारखा होता. अर्थात आपल्यालाही तो व्हिडीओ पाहताना घाबरायला नक्कीच होईल. आणि साराने जसं घाबरून डोळे मिटले तसे कदाचित आपणही करू.

हेही वाचा: आनंदाचे क्षण! हळदी समारंभात रंगपंचमी खेळला होता वरुण धवन,पहा फोटो

ही घटना रविवारी घडली आहे, साराने आधी तिच्या इन्स्टाग्राम स्टेरीवर हा व्हिडीओ शेअर केला होता. दरम्यान,सारा अली खान सध्या इंदूरमध्ये आहे,जिथे ती लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी सिनेमाचं शूटिंग करीत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत विकी कौशल आहे. हा सिेनमा कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननच्या 'लुका छुप्पी' चा सीक्वेल असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.

Web Title: Sara Ali Khan Meet An Accident During Makeup As Light Blub Explode On Her Face Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top