esakal | पहिल्याच आठवड्यात सारा गुरपाल ‘बिग बॉस’मधून आऊट
sakal

बोलून बातमी शोधा

sara gurpal out from big boss

 काहीही झालं तरी बिग बॉसचा भाग चूकवायचा नाही असा विचार करणारी डाय हार्ड फॅन या शो ची आहेत. आता त्यात व्टिस्ट य़ायला सुरुवात झाली आहे. या शो मधून पहिल्याच आठवड्यात सारा गुरपाल आऊट झाल्याने चर्चेला उत आला आहे. 

पहिल्याच आठवड्यात सारा गुरपाल ‘बिग बॉस’मधून आऊट

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - वाद, भांडणे, तक्रारी यासाठी ओळखल्या जाणा-या बिग बॉसचा यंदाचा सीझनही चांगलाच रंगात यायला सुरुवात झाली आहे. काहीही झालं तरी बिग बॉसचा भाग चूकवायचा नाही असा विचार करणारी डाय हार्ड फॅन या शो ची आहेत. आता त्यात व्टिस्ट य़ायला सुरुवात झाली आहे. या शो मधून पहिल्याच आठवड्यात सारा गुरपाल आऊट झाल्याने चर्चेला उत आला आहे. 
रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या १४ व्या सीझनला  सुरुवात झाली. हा शो सुरु होऊन आता दोन आठवडे उलटून गेले आहेत.

 प्रत्येक स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात टिकून राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. यासगळयात अभिनेत्री सारा गुरपाल हिला मात्र शोमध्ये टिकून राहता आलं नाही. पहिल्याच आठवड्यात ती ‘बिग बॉस’मधून अ‍ॅलिमिनेट झाली आहे. शोमधून बाहेर पडताच तिने घरातील इतर स्पर्धकांवर निशाणा साधला. “प्रेक्षकांनी नाही तर घरातील काही स्वार्थी स्पर्धकांनी मला एलिमिनेट केलं” असा आरोप तिने केला आहे.

सोशल मीडियाद्वारे चर्चेत असणा-या साराने ‘बिग बॉस’च्या घरात मात्र ती इतर कलाकारांपुढे तिचा निभाव लागला नाही. पहिल्या दिवसापासूनच तिच्याविरोधात वातावरण तयार झालं होतं. टास्कमध्येही इतर स्पर्धकांनी तिला बाजूला सारलं. परिणामी चांगला खेळ सादर न केल्यामुळे साराला ‘बिग बॉस’मधून अ‍ॅलिमिनेट करण्यात आलं आहे. साराने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. “बिग बॉसमध्ये माझ्यासोबत जे घडलं ते योग्य नव्हतं. मला प्रेक्षकांनी नाही तर घरातील स्वार्थी स्पर्धकांनी एलिमिनेट केलं. खरं तर मी खूप छान खेळत होते. प्रत्येक टास्कमध्ये मी भाग घेतला.

शो मधील उर्वरीत स्पर्धकांनी  साराविरोधात मतदान केल्याने  तिला ‘बिग बॉस’मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.  घरातील प्रत्येक काम मी काळजीपूर्वक करत होते. बिग बॉसच्या घरात मी आणखी काही दिवस राहावं अशी प्रेक्षकांची इच्छा होती. परंतु घरातील काही लोकांना माझी भीती वाटत होती त्यामुळे त्यांनी मला बाहेर काढलं. मला त्यांनी धोका दिला आहे. ” अशी पोस्ट साराने लिहिली आहे.