रक्त उसळवणारा 'सरसेनापती हंबीरराव'चा ट्रेलर चुकूनही चुकवू नका.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sarsenapati hambirrao movie trailer released

रक्त उसळवणारा 'सरसेनापती हंबीरराव'चा ट्रेलर चुकूनही चुकवू नका..

Marathi Movie: बहुचर्चित, बहुप्रतिक्षित अशा सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. आतापर्यत त्याच्या लूकला, टीझरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते (Marathi entertainment News) प्रविण विठ्ठल तरडे यांच्या भव्यदिव्य ऐतिहासिक (Actor Pravin Tarde) "सरसेनापती हंबीरराव" (Sarsenapati Hambirrao) या चित्रपटाची सध्या मोठी चर्चा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर कधी येईल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते. अखेर हा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा: शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळेवर गुन्हा दाखल..

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती असलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रविण तरडे साकारत आहेत. या निमित्ताने उभ्या महाराष्ट्राला प्रविण तरडे आणि स्नेहल तरडे हे रियल लाईफमध्ये एकमेकांची खंबीर साथ देणारे पतीपत्नी आता रील लाईफमध्येही एकमेकांना साथ देताना पाहायला मिळणार आहेत. अभिनेता गश्मीर महाजनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. स्वराज्याला श्रीमंती मिळवून देणाऱ्या हंबीररावांचा सोनेरी इतिहास या माध्यमातून उलगडला जाणार आहे. (sarsenapati hambirrao movie trailer launched)

हंबीरराव हे छत्रपतींचे मामा होते. मामा म्हणून नाते आणि स्वराज्यासाठीचे कर्तव्य एकाच वेळी पार पडणारा हा धुरंधर योद्धा आता रुपेरी पडद्यावर येणार आहे. या ट्रेलरने चाहत्यांचा थरकाप उडवला आहे. साहस, शौर्य आणि उत्तम संवाद याने भरलेला हा ट्रेलर आहे. 'परिस्थती जेवढी बिकट तेवढा मराठा तिखट', 'शिवाजी हा कोना एकाचा नाही तर समद्या रयतेचा आहे', 'संभाजी समजून घ्यायला काळजी शिवाजीचं असायला हवं' असे काळजाचा ठोका चुकवणारे संवाद या ट्रेलरमधून समोर आले आहेत. त्यामुळे हा चित्रपट कधी रिलीज होणार याची उत्सुकता वाढली आहे.

Web Title: Sarsenapati Hambirrao Movie Trailer Released

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top