
Satish Kaushik: सतीश कौशिक यांची मुलगी वंशिकाने डिलीट केले इन्स्टा अकाउंट, 'ही' होती शेवटची पोस्ट
सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी दररोज नवनवे खुलासे होत आहेत. अभिनेत्याचे कुटुंबीय आणि मित्रांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्याचबरोबर सतीश कौशिक यांच्या मृत्यूबाबत पोलीसही धक्कादायक खुलासे करत आहेत. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्व स्टार्स त्यांची आठवण काढत भावूक होत आहेत.
सतीश यांच्या मुलीनेही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करून त्यांची आठवण काढली होती. आता वंशिकाने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केल्याचे बोलले जात आहे.
सतीश कौशिक यांचे 8 मार्च रोजी निधन झाले, त्यानंतर त्यांची 11 वर्षांची मुलगी वंशिका हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा आणि वडिलांचा फोटो शेअर केला होता. आणि आता वंशिकाने तिचे अकाउंट डिलीट केले आहे.
सतीश यांनी अनेकदा आपली मुलगी वंशिकासोबतचे फोटो शेअर करायचे आणि फोटोंमध्ये आपल्या मुलीला टॅगही करायचे. ज्या आयडीने अभिनेता वंशिकाला त्यांच्या पोस्टवर टॅग करत असे तो आयडी आता इंस्टाग्रामवर उपलब्ध नाही.
इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यापूर्वी, वंशिकाच्या शेवटच्या पोस्टमध्ये तिचे वडील सतीश यांच्यासोबत एक सुंदर फोटो शेअर केला होता. फोटोत वंशिका तिच्या वडिलांना मिठी मारताना दिसत होती आणि दोघेही खूप आनंदी दिसत होते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने फक्त हृदयाचा इमोजी पोस्ट केला होता.