Satish Kaushik Death : 'काही झालं तरी हटायचं नाही हे मुंबईनं शिकवलं तर पुण्यानं...'

अभिनेता व्हायला आलो पण झालो दिग्दर्शक. नियतीची कृपा दुसरं काय, एनएसडीमध्ये शिक्षण घेतलं. पुण्यातल्या एफटीआयआयमध्येही होतो.
Satish Kaushik Death
Satish Kaushik Deathesakal
Updated on

Satish Kaushik Death Pune FTII Delhi NSD : जेवणामध्ये किती पंचपक्वान असलं तरी त्या ताटात जोपर्यत चटणी, लोणचं येत नाही तोपर्यत त्या जेवणाची रंगत काय येत नाही. असं म्हणतात. सतीश कौशिक यांच्या अभिनयाविषयी असं काहीसं सांगता येईल. या अभिनेत्यानं पुण्यातील एफटीआयआयमध्ये दिग्दर्शनाचे धडे गिरवले. तर दिल्लीतील एनएसडीमध्ये अभिनयाचं शिक्षण घेतलं. त्या आठवणी, तो प्रवास काही वेगळाच होता.

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांच्या अकाली एक्झिटनं चाहते शोकाकूल झाले आहेत. बॉलीवूडवर मोठा आघात झाला आहे. कौशिक यांच्या निधनानंतर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. कौशिक यांचा प्रवास वेगवेगळ्या शहरांमधून झाला. मुंबईपर्यत येऊन तो संपला, हरियाणा, दिल्ली, पुणे आणि मुंबई या शहरांमधून कौशिक यांना जो संघर्ष पाहायला मिळाला, तो त्यांच्या कलाकृतीतून दिसून आला.

Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

एका मुलाखतीमध्ये कौशिक यांनी आपल्या प्रवासाला शब्दबद्ध केले होते. ते म्हणाले होते की, मी आलो होतो अभिनेता व्हायला आलो पण झालो दिग्दर्शक. नियतीची कृपा दुसरं काय, एनएसडीमध्ये शिक्षण घेतलं. पुण्यातल्या एफटीआयआयमध्येही होतो. मी जेव्हा अभिनेता होण्याचं पूर्ण शिक्षण घेतलं तेव्हा मला काही काम मिळत नव्हतं.

मी एका सर्वसाधारण कुटूंबातून आलो होतो. आता वेगवेगळ्या शहरांमध्ये शिकायचे तर जवळ म्हणावे एवढे पैसेही नव्हते. अशावेळी मला काम करुन शिकावं लागलं. पण तो अनुभवही खूप काही शिकवणारा होता. त्यातून मी घडलो. साफसफाईचं काम मला करावं लागलं होतं.आज ते आठवलं तर डोळ्यातून पाणी येतं. हा सगळा प्रवास खूपच अविस्मरणीय असाच आहे. मला एक सहाय्यक दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर सगळं सुरु झालं.

Satish Kaushik Death
Satish Kaushik: 'प्रवासात रात्री उशिरा...', अनुपम खेरनी सांगितला कौशिक यांचा शेवटचा क्षण

नियतीचा खेळ कसा असतो पाहा, मला अभिनेता व्हायचं होतं. त्याच भूमिका मिळाव्या अशी माझी इच्छा होती. मात्र तसे काही झाले नाही. त्यामुळे तुम्हालाही जे काही मिळेल त्यात पूर्ण समर्पित भावनेनं काम करा. ते सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. त्यातून आपण आणखी घडतो. हे आवर्जुन सांगावं लागेल.

Satish Kaushik Death
61 व्या वर्षी सतीश कौशिक यांनी कमी केले होते 23 किलो वजन Satish Kaushik

पुण्यातील त्या दिवसांनी खूप काही शिकवलं. त्यातून घडत गेलो. पुण्याचे वातावरण शिक्षणाला पोषक होते. चौकटीबाहेर राहून विचार करण्यास पुण्यानं शिकवलं होतं. पुण्यात ज्या क्षेत्रात पदार्पण करायचं होतं त्याबद्दलची वैचारिक बैठक तयार होत गेली. व्यक्त कसं व्हावं, त्यासाठीची खास शैली ही पुण्यातील वातावरणातून मला शिकवली. आमची बाकीची मित्र मंडळी जी पुण्यातील होती, पुण्याची होती त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं. अशी भावना कौशिक यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com