गणपती बाप्पा मोरया ! म्हणत कार्तिकने सुरु केले 'सत्यप्रेम कथा'चे चित्रीकरण | Satyaprem Katha And Kartik Aaryan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan Satyaprem Katha Shooting Starts

गणपती बाप्पा मोरया ! म्हणत कार्तिकने सुरु केले 'सत्यप्रेम कथा'चे चित्रीकरण

Satyaprem Ki Katha Kartik Aaryan Starts Shooting : बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या फ्लॉप चित्रपटांवरील वक्तव्यामुळे चर्चेत आहे. जिथे आमिर खानपासून ते अक्षय कुमारपर्यंत कार्तिकचा मागील चित्रपट 'भूल भुलैय्या २' बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकला नाही. दरम्यान, आता कार्तिकने त्याच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे.

अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या नवीन चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केल्याची माहिती देऊन सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. कियारा अडवाणी (Kiara Advani) 'सत्यप्रेम की कथा'मध्ये कार्तिकसोबत दिसणार आहे. सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो पोस्ट करून कार्तिकने गणेश उत्सवानिमित्त त्याच्या चाहत्यांना एक सुखद बातमी दिली आहे.

इंडस्ट्रीत स्वत:च्या मेहनतीवर नाव कमावणाऱ्या कार्तिक आर्यनची (Kartik Aaryan) फॅन फॉलोइंग कोणापासून लपलेली नाही. त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी लोकांमध्ये उत्सुकता असते. अशा परिस्थितीत, आज कार्तिकने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आणि आगामी 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाल्याची माहिती दिली.

चित्रात कार्तिक गणपती बाप्पासमोर प्रार्थना करताना दिसत आहे. बाप्पाचे आशीर्वाद घेत फोटो शेअर करत कार्तिकने लिहिले, 'सत्य एक प्रेम कथा सुरू, गणपती बाप्पा मोरया !

टॅग्स :kartik aaryan