राज्यपालांच्या उपस्थिती राजभवनात झाले 'कालजयी सावरकर'चे स्क्रिनींग.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

saurabh gokhale's kaljayi savarkar short film special screening in rajbhavan with governor bhagat singh koshyari

राज्यपालांच्या उपस्थिती राजभवनात झाले 'कालजयी सावरकर'चे स्क्रिनींग..

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या प्रमुख उपस्थितीत विवेक समूह निर्मित 'कालजयी सावरकर' या लघुपटाचा विशेष प्रिव्हियू शो नुकताच राजभवनात संपन्न झाला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी राजभवनातील वातावरण भारावून गेले होते. यावेळी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. राजभवनातील 'जल विहार' सभागृहात हा सोहळा रंगला. यावेळी भारतीय विचार दर्शन संस्थेचे अध्यक्ष सुश्रुत चितळे यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

(saurabh gokhale's kaljayi savarkar short film special screening in rajbhavan with governor bhagat singh koshyari)

सावरकरांचे केवळ चरित्र लघुपटातून न मांडता त्यांचे विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने हा लघुपट बनवण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील सर्व पैलूंचे उत्तम दर्शन घडवणारा 'कालजयी सावरकर' हा लघुपट आहे. 'सावरकरांच्या विचारांतून नव्या भारताचे प्रभावी चित्रण या लघुपटातून करण्यात आले. विचारांना चालना देणारा हृदयस्पर्शी असा हा लघुपट आहे,' असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मांडले.

याप्रसंगी उपस्थित लघुपटातील मुख्य कलाकार मनोज जोशी, तेजस बर्वे आणि सौरभ गोखले यांना प्रत्यक्ष भेटून प्रेक्षकांनी त्यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. या लघुपटाचे दिग्दर्शन जाहिरात विश्वातील प्रख्यात दिग्दर्शक गोपी कुकडे यांनी केले असून, क्रिएटिव्ह दिग्दर्शक विनोद पवार यांचे आहे. हा लघुपट अधिकाधिक लोकांपर्यंत आणि विशेष करून आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहचण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी राज्यपालांच्या समवेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आमदार प्रविण दरेकर यांनीही आवर्जून उपस्थिती लावली होती. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे हे ही या प्रसंगी उपस्थित होते. आयोजकांच्या वतीने मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार हे ही या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी मान्यवरांचे आभार मानत सदर लघुपट अधिकाधिक लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले.

Web Title: Saurabh Gokhales Kaljayi Savarkar Short Film Special Screening In Rajbhavan With Governor Bhagat Singh Koshyari

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Marathi Movies