धुरपीचे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य - सविता मालपेकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

राजापूर - काकस्पर्श, नटसम्राट आदी  गाजलेल्या चित्रपटांसह टीव्ही मालिका आपल्या दमदार अभिनयाने गाजविणाऱ्या सविता मालपेकर यांनी ग्रामीण भागातील परिस्थितीला गांजलेली पत्नी आणि आई अशी दुहेरी भूमिका ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटामध्ये साकारली आहे.

संवेदनशील सामाजिक विषयावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या चित्रपटामध्ये राजापूरच्या सुकन्या सविता मालपेकर यांनी साकारलेली धुरपी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहे. 

अभिनेता लेखक, दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट गत महिन्यात प्रदर्शित झाला. त्याची अभिजित भोसले यांच्या जेन्युईन प्रॉडक्‍शन एलएलपी आणि पुनित बालन एटरमेंट प्रा. लि. यांच्यामार्फत निर्मिती केली आहे. आपल्या हक्काची शेतजमीन विकून त्यातून मिळालेल्या पैशासोबत भविष्य घडविण्यासाठी शहराची वाट धरलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबाची पुढे फरफट होते, असे कथानक आहे. राजापूरचे सुपुत्र महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, क्षितिज दाते, सुनील अभ्यंकर, रमेश परदेशी आदींच्या भूमिका आहे.

डोळ्यामध्ये झणझणीत अंजन
सध्या कोकणात प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यातून जमीन खरेदी-विक्रीला तेजी आली आहे. आपल्या शेतजमिनी विकल्यास भविष्यात कोणती परिस्थिती येऊ शकते, विस्थापित होणाऱ्या कुटुंबाची कशा पद्धतीने फरफट होते, यावर डोळ्यामध्ये झणझणीत अंजन चित्रपटातून घातले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savita Malpekar comment