दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचे निधन; १९ हून अधिक चित्रपटांची निर्मिती

हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले
Sawan Kumar Tak Passed Away
Sawan Kumar Tak Passed AwaySawan Kumar Tak Passed Away

Sawan Kumar Tak Passed Away सनम बेवफा सारख्या चित्रपटासाठी सलमान खानचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक (Director) सावन कुमार टाक (८६) यांचे निधन झाले आहे. बुधवारी त्यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आता त्यांचे निधन झाल्याचे समजते.

सावनजी (Sawan Kumar Tak) ८६ वर्षांचे होते. त्याचे लग्न झाले नव्हते. त्यांना तीन बहिणी आणि भाऊ आहे. दोन दिवसांपासून त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यानंतर त्यांना कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन (Death) झाले. त्यांनी आतापर्यंत १९ हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे, असे सावन कुमार यांचे पीआरओ मंटू सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.

Sawan Kumar Tak Passed Away
The Kapil Sharma Show Promo : अर्चना म्हणाली, बायको आठवत नाही अन्...

सावन कुमार यांनी सनम बेवफा, सौतन सारखे ब्लॉक बस्टर चित्रपट दिले. साजन बिना सुहागन सारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित (Director) केले आहेत. तसेच लिहिलेले आहेत. कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केल्यानंतर सावन यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना आयसीयूमध्ये ठेवले होते. सावन कुमार यांचे पुतणे नवीन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खालावत होती.

पीटीआयच्या वृत्तानुसार, फुफ्फुसात संसर्ग आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची फुफ्फुसे आणि हृदयही नीट काम करीत नसल्याने प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. सावन टाक यांना फुफ्फुसाचा आजार असल्याची पुष्टीही डॉक्टरांनी केली होती.

Sawan Kumar Tak Passed Away
शाहरुखने सांगितले होते Boycott चे फायदे; जुन्या व्हिडिओवर नेटकऱ्यांचा संताप

१९७२ मध्ये करिअरला सुरुवात

सावन कुमार टाक यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर चित्रपट निर्मात्याने १९७२ मध्ये गोमती के किन या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. याशिवाय त्यांनी गीतकार म्हणूनही काम केले. सावन यांनी कहो ना प्यार है मधील प्यार की कश्ती में, जानेमन जानेमन आणि चांद सितारे यासारख्या गाण्यांसाठी गीत लिहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com