
केन स्पीअर्स यांचे नुकतेच आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कार्टुन निर्मिती क्षेत्रावर दु;खाचे सावट पसरले आहे. वयाच्या 82 वर्षी अखेरचा श्वास घेतला.
मुंबई - एक काळ होता त्यावेळी टेलिव्हिजनवरुन प्रसारित होणा-या कार्टुन कार्यक्रमांचा राखीव प्रेक्षक होता. त्याला वेगळा प्राधान्यक्रम होता. त्यावेळी आता सारखी ढीगभर कार्टूनची चॅनेल्स नव्हती. म्हणून जे काही मोजकेच कार्टुन होते त्यांच्यातील क्रिएटिव्हीटी कमालीची सुंदर होती. त्याला मिळणारा प्रतिसाद प्रचंड होता. 'स्कूबी डू' हे कार्टुनही त्यापैकी एक असे होते. आजही त्याचे नाव काढताच वयाच्या चाळीशीतल्या लोकांना नॉस्टॅल्जिक झालेले वाटणे स्वाभाविक आहे.
ज्या हातांनी 'स्कूबी डू' ही सुंदर कलाकृती तयार झाली. अशा केन स्पीअर्स यांचे नुकतेच आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कार्टुन निर्मिती क्षेत्रावर दु;खाचे सावट पसरले आहे. वयाच्या 82 वर्षी अखेरचा श्वास घेतला.अमेरिकेतील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. केन यांचा मुलगा केव्हीन याने त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. गेली काही वर्षे ते बॉडी डिमेंशिया या आजारामुळे त्रस्त होते. त्यांच्या मागे केविन आणि क्रिस ही दोन मुले, दोन सूना, पाच नातू आणि तीन पणतू आहेत.
'Scooby-Doo' co-creator Ken Spears dies at 82
(via @Variety | https://t.co/LF0iGK8Yyf) pic.twitter.com/445aAiHkor
— Fandom (@getFANDOM) November 9, 2020
स्पीअर्स यांचा जन्म 12 मार्च 1938 मध्ये कॅलिफोर्निया येथे झाला होता. 1969 मध्ये केन स्पिअर्स यांनी जो रबी यांच्या मदतीने ‘स्कूबी डू’ या कार्टूनची निर्मिती केली होती. स्कूबी हा एक कुत्रा आहे. तो आपल्या मित्रमंडळींच्या मदतीने विविध प्रकारच्या रहस्यांचा उलगडा करतो. हे कार्टून आपल्या जबरदस्त पटकथेमुळे लोकप्रिय झाले. स्पीअर्स यांनी आयुष्याच्या शेवटापर्यंत या कार्टूनवर काम केले. ते एक उत्तम स्केच आर्टिस होते. त्यांनी 'डायनोमुट', 'जबरजॉ' ‘फांगफेस,’ ‘मिस्टर टी,’ आणि‘सेक्टॉर’ या सीरिज बनवल्या.