
स्वप्निल जोशीची कुमार महाजनची भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतली होती. त्याच्या चाहत्यांना ती खूप आवडली होती.
मुंबई - आपल्या आगळ्या वेगळ्या प्रकारच्या कथेनं आणि त्याच्या सादरीकरणानं सर्वांना जिंकून घेणारी वेबसीरिज म्हणजे समांतर वेबसीरीज. मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय झालेली ही वेबसीरीजच्या पहिल्या भागाला मोठी लोकप्रियता मिळाली होती. आता त्याचा दुसरा भागही प्रेक्षकांसमोर येत आहे.
या मालिकेचे सिरीजचे चित्रीकरण सध्या पाचगणी येथे जोरदार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या मालिकेतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ या चित्रीकरणासाठी एकत्र आले होते. वेब रीसीजच्या दुसऱ्या पर्वामध्ये स्वप्नील जोशी आणि नितीश भारद्वाज काम करत आहेत. पहिल्या भागातील त्यांच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘समांतर’च्या पहिल्या सिझनला अर्थात पर्वाला प्रेक्षकांनी पसंद केले. प्रेक्षकांना आता या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची प्रतीक्षा आहे. सुदर्शन चक्रपाणीच्या भूमिकेत नितीश भारद्वाज भूमिकेत आहेत.
स्वप्निल जोशीची कुमार महाजनची भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतली होती. त्याच्या चाहत्यांना ती खूप आवडली होती. या सर्वच कारणांनी या वेब सिरीजबद्दलची रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.दुसऱ्या पर्वाचे चित्रीकरण सध्या पाचगणी येथे सुरु आहे. या चित्रीकरणात नुकतेच स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित आदी कलाकार सहभागी झाले होते. दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्याबरोबर यावेळी निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदारसुद्धा हजर होते.
Film Review ; बघु नये असा ' दुर्गामती '; वाटलं होतं असेल भारी पण...
पहिल्या पर्वाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते तर दुसरे पर्व समीर विद्वांस दिग्दर्शित करत आहेत. अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार म्हणाले, “समांतर’ ही आमची निर्मिती असलेली पहिली वेब सिरीज आहे. मराठी प्रेक्षक हा कथेच्या बाबतीत फार चोखंदळ असतो. सुहास शिरवळकर यांच्या दर्जेदार लेखणीतून साकारलेल्या कादंबरीवर आधारित ही वेबसिरीज असल्याने ती रेसिकांना खूप आवडली.
सुहास शिरवळकर यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ही सिरीज आधारित आहे. यातील कुमार महाजनला एके दिवशी कळते की त्याचे आयुष्य हे सुदर्शन चक्रपाणी आधीच जगून गेला आहे. तो मग त्याच्या भविष्यामध्ये काय लिहिले आहे, याचा शोध घेवू लागतो. स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज हे दोघेही त्यांनी साकारलेल्या कृष्णाच्या भूमिकांसाठी घराघरात ओळखले जातात. नितीश यांनी बी आर चोप्रा यांच्या ‘महाभारत’मध्ये (१९८८) कृष्णाची भूमिका साकारली होती तर स्वप्निल जोशींनी रामानंद सागर यांच्या ‘कृष्ण’ (१९९३) मालिकेत ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती.