ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनाने निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HEMANT JOSHI

ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनाने निधन

मराठी टेलिव्हिजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी Hemant Joshi यांचे १९ मे रोजी कोरोनाने निधन झाले. 'जीव झाला येडापिसा' jeev zala yedapisa या मालिकेत ते भावेंची भूमिका साकारत होते. हेमंत यांच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. जवळपास दोन दशकं त्यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रांत काम केलं. 'नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे', 'तेंडल्या', 'लायब्ररी', 'बालगंधर्व' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या. तर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतही ते झळकले होते. (Senior Marathi actor Hemant Joshi succumbs to Covid 19 complications)

हेही वाचा: 'हे आता मी खपवून घेणार नाही'; नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली सोनाली

अभिनेता सुप्रित निकमने सोशल मीडियावर हेमंत यांच्यासाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. 'काय लिहू आणि कसं लिहू सुचेना. हेमंत काका, नुकतंच 'जीव झाला येडपिसा'मधून तुम्ही घराघरात पोहोचला होता. लोक तुम्हाला जोशी कमी आणि जीव झाला मधले भावे म्हणून ओळखायला लागले होते. तुमच्या किती आठवणी, सांगू तितकं कमी आहे. मला आठवतो तो जळगाव ते सांगलीचा लांबचा प्रवास. त्या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत नसता तर कदाचित मी डिप्रेशनमध्ये गेलो असतो. एकाच सिनेमात काम करताना एका निर्मात्याने माझे पैसे बुडवल्याने प्रचंड निराश आणि खचलेला मी आणि मला सावरणारे आणि धीर देणारे तुम्ही. तुमचं ते वाक्य कायमच लक्षात राहील. 'तुझे ७० हजार बुडाले पण ७० लाखांचा अनुभव घेतलास तू, स्वामी असा अनुभव प्रत्येकाला देत नसतात, डोकं शांत ठेव आणि ऐश कर.' आज तुमच्या रूपाने मी माझा एक मित्र, हो मित्रच गमावला. कारण वडीलधारी असूनही तुम्ही जवळच्या मित्रापेक्षा कमी नव्हता. काका तुम्ही नेहमी तक्रार करायचे की मी फोन करत नाही. आता कुणाला फोन करू? शेवटचं भेटायचंही राहून गेलं हेमंत काका,' अशा शब्दांत सुप्रितने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

loading image
go to top