मुंडकी छाटणाऱ्या नराधमाची गोष्ट 'नेटफ्लिक्स'वर.. कोण आहे हा चंद्रकांत झा..

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली 'इंडियन प्रिडेटर' ही डॉक्युमेंट्री म्हणजे भयाण वास्तवाचा चेहरा आहे.
serial killer chandrakant jha who killed people and mutilate their bodies netflix docuseries indian predator
serial killer chandrakant jha who killed people and mutilate their bodies netflix docuseries indian predatorsakal
Updated on

chandrakant jhaa : नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली आयशा सूद दिग्दर्शित 'इंडियन प्रिडेटर- द बचर ऑफ दिल्ली' ही तीन भागांची डॉक्युमेंट्री सिरीज सध्या बरीच चर्चेत आहे. ही कपोकल्पित कथा नसून एक भूतकाळात घडलेल्या गंभीर घटनेला समाजासमोर आणणारी एक कलाकृती आहे. एका नराधमाने एखाद्या खाटिकाप्रमाणे निरपराध माणसांचे बळी घेतले, मोठा रक्तपात घडवला, त्या 'चंद्रकांत झा' या सिरीयल किलरची हि गोष्ट आहे. (Indian Predator: The Butcher of Delhi) (netflix web series )

बिहारमधील एक स्थलांतरित मजूर ते सिरीयल किलर असा 'चंद्रकांत झा' याचा दुर्दैवी प्रवास होता. व्यवस्थेच्या विरुद्ध बंद करण्यासाठी त्याने हा चुकीचा रस्ता निवडला आणि अनेक निष्पाप जीव मारले गेले. त्याची हत्या करण्याची पद्धत इतकी भयानक होती कि त्याविषयी एक दहशत लोकांच्या मनात न निर्माण झाली होती. कारण नोकरीचे आमिष दाखवून तो लोकांना जवळ करायचा, त्यांच्याशी संबंध वाढवायचा आणि एक दिवस त्यांचा खून करायचा. हत्येनंतर तो त्यांच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून द्यायचा. त्याने अक्षरशः हत्येचा सपाटा लावला होता.

(serial killer chandrakant jha who killed people and mutilate their bodies netflix docuseries indian predator)

1998 मध्ये त्याने पहिला खून केला त्यांनंतर तो तीन वर्षे तुरुंगात होता. त्याच्या विरुद्ध पुरावे न सापडल्याने त्याला 2002 मध्ये तुरुंगातून सोडले. त्यानंतर त्याने एकामागोमाग एक सहा लोकांची हत्या केली, पण त्यातील चार हत्ये मागे त्याच्या विरुद्ध पुरावे न सापडल्याने त्याला निर्दोष मुक्तता झाली. कारण त्याची हत्या करण्याची पद्धत एखाद्या माथेफिरू सारखी होती. हत्येनंतर मृत व्यक्तीच्या धडाचे तुकडे करून तो वेगवगेल्या ठिकाणी फेकून द्यायचा, त्यामुळे पोलिसांनाही गुन्ह्याचा तपास करणे कठीण होऊन बसायचे.

एकदा तर पोलिसांवरील राग दाखवण्यासाठी त्यांनी दोन लोकांची हत्या करून त्यांची मुंडकी तिहार तुरुंगाच्या बाहेर ठेऊन दिली. एवढेच नव्हे तर हिम्मत असेल तर मला शोधून दाखवा असे पत्रही सोबत ठेवले होते. चंद्रकांत झा याच्या विरोधात 14 गुन्ह्यांची नोंद आहे, त्यातील सात हत्येचे प्रकार आहेत. असं म्हणतात यूपी, बिहारवरुन कामाच्या शोधात दिल्लीत येणाऱ्या लोकांना नोकरीचे आमिष दाखवून तो त्यांची हत्या करायचा. बऱ्याचदा तो दारू देऊन समोरच्याला बेशुद्ध करून त्याचा खून करत होता. असं म्हणतात की हत्येनंतर तो त्या मृत व्यक्तीचे हात बांधून त्याच्यावर तंत्रमंत्र असे अघोरी प्रकारही करत होता. 2007 मध्ये त्याने शेवटची हत्या केली. ज्यावेळी तो पोलिसांच्या हाती लागला आणि त्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली. 2013 मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती परंतु 2016 मध्ये त्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com