"माधुरी-श्रीराम नेनें'ची लव्हस्टोरी छोट्या पडद्यावर 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 June 2019

ही मालिका अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने आणि तिचे पती श्रीराम नेने यांच्या प्रेमकथेवर आधारित असणार आहे.

"बिग बॉस 12' ची विजेती अभिनेत्री दीपिका कक्कड आणि "बहु हमारी रजमीकांत' फेम अभिनेता करण ग्रोवर हे लवकरच एका मालिकेतून एकत्र झळकणार आहेत. हे दोघेही "स्टार प्लस' वाहिनीवरील "कहॉं हम कहॉं तुम' या मालिकेतून प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. ही मालिका अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने आणि तिचे पती श्रीराम नेने यांच्या प्रेमकथेवर आधारित असणार आहे.

या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेच्या कथेत दीपिका अभिनेत्रीच्या भूमिकेत; तर करण सर्जनच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यात दीपिका तिच्या अभिनयाच्या क्षेत्रात व्यस्त असते आणि करण त्याच्या वैद्यकीय क्षेत्रात व्यस्त असल्याचे दाखवले आहे. माधुरी आणि श्रीराम यांची प्रेमकथा असणार म्हटल्यावर या मालिकेची उत्सुकता नक्कीच असणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Serial on Madhuri Dixit and Shriram Nene