esakal | आर्थिक संकटात असलेल्या अभिनेत्रीची माधुरीने केली मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Shagufta Ali

आर्थिक संकटात असलेल्या अभिनेत्रीची माधुरीने केली मदत

sakal_logo
By
स्वाती वेमूल

चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात सक्रिय असलेली अभिनेत्री शगुफ्ता अलीच्या Shagufta Ali मदतीला बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित Madhuri Dixit धावून आली आहे. कोरोना महामारी, लॉकडाउन आणि आरोग्याच्या समस्यांमुळे शगुफ्ता गेल्या चार वर्षांपासून आर्थिक समस्यांना तोंड देत आहे. तिने इंडस्ट्रीकडे मदतीची विनवणी केल्यानंतर आता माधुरीने शगुफ्ताला पाच लाख रुपये दिले आहेत. 'डान्स दिवाने ३'च्या Dance Deewane 3 टीमकडून ही रक्कम देण्यात आली आहे. शगुफ्ताने नुकतीच या शोच्या सेटवर हजेरी लावली होती. यावेळी तिने गेल्या ३६ वर्षांतील तिचा प्रवास प्रेक्षकांना सांगितला. या विशेष एपिसोडमध्ये अनिल कपूर, फरहान अख्तर आणि रोहित शेट्टी यांनीसुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. (Shagufta Ali gets aid from Madhuri Dixit on behalf of Dance Deewane team)

"गेली ३२ वर्षे माझी खूप चांगली गेली. मी खूप काम केलं, कुटुंबीयांकडून साथ मिळाली. पण गेल्या चार वर्षांपासून मला काहीच काम मिळालं नाही. त्याचवेळी माझ्या आरोग्याच्या समस्या उद्भवल्या", असं सांगताना शगुफ्ता भावूक झाल्या होत्या. शगुफ्ताचा संघर्ष ऐकून सूत्रसंचालक भारती सिंगसुद्धा भावूक झाली. यावेळी माधुरीने मंचावर येऊन शगुफ्ता यांना मिठी मारली आणि त्यांना पाच लाख रुपये मदत म्हणून देणार असल्याचं जाहीर केलं.

हेही वाचा: 'कमेंट सेक्शन बंद कर नाहीतर..'; आमिरच्या घटस्फोटानंतर चाहत्यांचा फातिमाला सल्ला

गेल्या काही वर्षांत आर्थिक परिस्थिती खालावल्याने कार आणि दागिने विकल्याचं शगुफ्ता यांनी सांगितलं होतं. "गेल्या चार वर्षांत काम कमी झाल्याने मला आर्थिक समस्या जाणवू लागल्या. कामच मिळत नसल्याने मी कार आणि दागिने विकून कसंबसं घर चालवत होती. पहिल्या दोन-तीन वर्षांत मी माझ्या परीने गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या वर्षभरात परिस्थिती आणखीनच खालावली. मी जमा केलेले सर्व पैसे संपले. खरंतर मला कोणाकडेच पैसे मागायचे नव्हते. पण महामारीमुळे गोष्टी अजूनच कठीण झाल्या. गेल्या चार वर्षांपासून मी त्रास सहन करतेय. गेल्या वर्षभरात जेवढी लोकांची वाईट परिस्थिती झाली, तेवढी माझी गेल्या चार वर्षांत झाली", असं त्या म्हणाल्या होत्या.

loading image