Pathaan: शाहरुख - सलमान पठाण मध्ये एकत्र, व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathaan, salman khan, shah rukh khan

Pathaan: शाहरुख - सलमान पठाण मध्ये एकत्र, व्हिडिओ व्हायरल

शाहरुख खानचा पठाण सिनेमा आज २५ जानेवारीला संपूर्ण भारतात रिलीज झालाय. सिनेमाची थेटरमध्ये आणि थेटरबाहेर प्रचंड क्रेझ आहे. पठाण मध्ये टायगर म्हणजेच अभिनेता सलमान खान असणार अशी चर्चा होती. अखेर हे निश्चित झालंय. शाहरुख - सलमान चा पठाण मधला एक सिन सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. या सिनमध्ये सलमान त्याच्या खास टायगर अवतारात पठाण म्हणजेच शाहरुखला मदत करताना दिसतोय.

हेही वाचा: Shah Rukh Khan Pathaan: आणि शाहरुख पर्व सुरू.. पठाण च्या पहिल्याच शो ला तुफान गर्दी

व्हायरल झालेल्या व्हिडिओत सलमान खानच्या एंट्रीला टाळ्या शिट्यांचा कमाल माहोल थेटरमध्ये झाला. टायगर ची खास म्युसिक सलमानच्या एंट्रीला वाजली. आणि पुढे शाहरुख - सलमान एकदम ऍक्शन मोड मध्ये शत्रूंवर तुटून पडले. शाहरुख - सलमानचा हा जबरदस्त अंदाज त्यांच्या फॅन्सना नक्कीच आवडला असून प्रेक्षकांचं पैसा वसूल मनोरंजन होतंय यात शंका नाही.

पठाण निमित्ताने यशराज फिल्मस स्पाय युनिव्हर्स तयार करत आहे. पठाण मध्ये आज टायगर म्हणजेच सलमान खानची एंट्री झाली. लवकरच सलमान - शाहरुख सोबत वॉर फेम अभिनेता हृतिक रोशन सुद्धा सहभागी होणार आहे. अशाप्रकारे सलमान - शाहरुख - हृतिक या तिघांचं मिळून स्पाय युनिव्हर्स तयार होणार आहे. पठाण नंतर सलमानच्या आगामी टायगर ३ सिनेमात शाहरुख आणि हृतिक एकत्र दिसण्याची शक्यता आहे.

शाहरुख खानचा 'पठाण' सिनेमा आज २५ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होत आहे. या सिनेमात दीपिका पदूकोण,जॉन अब्राहम,डिंपल कपाडिया,आशुतोष राणा सोबत अेनक स्टार्स असणार आहेत. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यश राज फिल्म्सच्या प्रॉडक्शन अंतर्गत हा सिनेमा बनवण्यात आला आहे.

टॅग्स :Shah Rukh Khansalman khan