
PM Modi Birthday : सुट्टी घ्या आणि मजा करा; शाहरुख खानचा मोदींना सल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७२ वा वाढदिवस आहे. त्यांना सकाळपासूनच देशभरातून, जगभरातून शुभेच्छा येत आहेत. राजकीयच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातूनही त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अभिनेता शाहरुख खाननेही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. यामध्ये शाहरुखने त्यांना सुट्टी घेण्याचा सल्ला दिला आहे.
शाहरुख खानने ट्वीट करत पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये शाहरुख खान म्हणतो, "देश आणि देशवासियांच्या कल्याणाप्रती असलेला तुमचा सेवाभाव कौतुकास्पद आहे. तुमची ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला शक्ती आणि आरोग्य लाभो. सर, आता एक दिवस सुट्टी घ्या आणि तुमचा वाढदिवस साजरा करा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्य सरकारनेही पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचं आयोजन केलं आहे. तसंच केरळमध्ये आजच्या दिवशी जन्मणाऱ्या बालकांना सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. तर दिल्लीमध्ये ५६ इंच या नावाची थाळी लाँच करण्यात आली आहे. यामध्ये ५६ पदार्थ असणार आहेत.