
बॉलिवूडमधील अनेक कलाकार उत्साहाने, आनंदाने विविध भारतीय सण-उत्सव साजरा करताना दिसतात. यंदासुद्धा गणेशोत्सव सर्वांनी साध्या पद्धतीने साजरा केला आणि रविवारी अनंत चतुर्दशीला जड अंत:करणाने बाप्पाला Ganpati Bappa निरोप दिला. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात किंवा घरच्या घरी केलं. याला बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानसुद्धा Shah Rukh Khan अपवाद नव्हता. शाहरुखच्या मुंबईतील 'मन्नत' या निवासस्थानी दरवर्षी गणरायाचं आगमन होतं. बाप्पाचा फोटो त्याने अनंत चतुर्दशीला रात्री ट्विटरवर पोस्ट केला आहे.
ट्विटरवर शाहरुखने त्याच्या घरच्या गणपतीच्या मूर्तीचा फोटो पोस्ट केला. 'बाप्पाला पुढच्या वर्षी पुन्हा भेटेपर्यंत त्यांचे आशीर्वाद आपणा सर्वांवर असेच राहू दे. गणपती बाप्पा मोरया!', असं त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. दरवर्षी शाहरुख त्याच्या कुटुंबीयांसोबत गणेश चतुर्थी साजरी करतो. छोटा मुलगा अबराम हा गणपतीच्या पाया पडतानाचा फोटो त्याने २०१८ साली पोस्ट केला होता. बाप्पाचा फोटो पोस्ट केल्यामुळे काहींनी त्याच्यावर राग व्यक्त केला आहे तर काहींनी त्याचं कौतुक केलं आहे.
'झिरो' या चित्रपटानंतर शाहरुखचा एकही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही. त्याचे चाहते त्याच्या चित्रपटाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत असतात. 'झिरो' हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर शाहरुखने बराच काळ चित्रपटांपासून ब्रेक घेतला. आता त्याचा 'पठाण' हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं कळतंय. यामध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत असतील. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.