Shah Rukh Khan Birthday: आज शाहरुखचा वाढदिवस, रात्रीपासूनच 'मन्नत' बाहेर तुफान गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shah Rukh Khan Birthday Fans crowd outside Mannat

Shah Rukh Khan Birthday: आज शाहरुखचा वाढदिवस, रात्रीपासूनच 'मन्नत' बाहेर तुफान गर्दी

Shah Rukh Khan Birthday : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) म्हणजे अवघ्या मनोरंजन विश्वाचा किंग खान. आज किंग खानचा ५७ वा वाढदिवस आहे‌. शाहरुख खानचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे वाढदिवसाला सुरुवात होताच शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. मुंबईत तर त्याच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची अक्षरशः जत्रा भरली आहे. आपल्या लाडक्या सुपरस्टारला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहते रात्रीच त्याच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले.

(Shah Rukh Khan Birthday Fans crowd outside Mannat at midnight)

शाहरुख खानचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठी एका सणापेक्षाही कमी नाही. आणि आज किंग खान ५७ बर्थडे साजरा करत आहे.शाहरूख खानचा फॅन्सने रात्री पासुन शाहरूखच्या 'मन्नत' बंगल्या बाहेर गर्दी केली असून आपल्या लाडक्या शाहरूखला ते शुभेच्छा देत आहेत. कुणी त्याच्यासाठी फुलं आणली आहेत तर कुणी भेटवस्तू, तर कुणी पोस्टर घेऊन पोहोचलं आहे.

आपल्या फॅन्सचे प्रेम पाहून शाहरूख खानने पण बाल्कनीतून त्यांना अभिवादन केले. तेव्हा त्याचा लहान मुलगा अबरामही त्याच्यासोबत होता. शाहरुखने त्याची नेहमीची पोज देत म्हणजे हात पसरवून चाहत्यांचे प्रेम स्वीकारले.

शाहरुख खान चार दशकांहून अधिक काळ कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. मग तो राज असो किंवा राहुल. शाहरूख ने 1989 मध्ये 'दीवाना' चित्रपटातून पदार्पण केले‌. त्यानंतर 'कुछ कुछ होता है...', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कल हो ना हो', 'स्वदेस', ओम शांती यांसारख्या चित्रपटांतून आपली अभिनयाची छाप पाडली.ओम', 'चक दे!', 'रईस' आणि बरेच काही न संपणारी लिस्ट आहे.

शाहरुख खानाचे आगामी चित्रपट सिद्धार्थ आनंदच्या 'पठाण' मध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. त्याच्यासोबत अॅटलीचा जवान, विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्या सोबत आहे. हा चित्रपट 2 जून 2023 रोजी रिलीज होणार आहे, त्याशिवाय, शाहरूख खान तापसीसोबत राजकुमार हिरानीचा 'डंकी' मध्ये दिसणार आहे