Shahrukh Khan: 'माझी मुलं ही...' मुलांच्या करिअरविषयी किंग खान पहिल्यांदाच बोलला!

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा नेहमीच त्याच्या हटके स्वॅगसाठी ओळखला जातो. यंदाचं वर्ष किंग खानला खूपच लाभदायी ठरल्याचे दिसून आले आहे.
Shah Rukh Khan Bollywood Actor Dunki Interview
Shah Rukh Khan Bollywood Actor Dunki Interviewesakal

Shah Rukh Khan Bollywood Actor Dunki Interview : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा नेहमीच त्याच्या हटके स्वॅगसाठी ओळखला जातो. यंदाचं वर्ष किंग खानला खूपच लाभदायी ठरल्याचे दिसून आले आहे. याच वर्षी त्याचा पठाण प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आलेल्या जवाननं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता त्याचा डंकीही प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय आहे.

या सगळ्यात शाहरुखची लाडकी लेक सुहाना खाननं द आर्चिजमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटातून केवळ सुहानाच नाहीतर अमिताभ बच्चन, जया बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, श्रीदेवी अन् बोनी कपूर यांची लेक खूशी कपूरनं देखील डेब्यू केलं आहे. त्यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी त्यांची पाठ थोपटली आहे.

शाहरुख सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅनशी संवाद साधत असतो. त्याच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरील चर्चा सत्रात हजारोच्या संख्येनं नेटकरी सहभागी होत असतात. शाहरुखनं डंकीच्या निमित्तानं चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यानं पहिल्यांदा आपल्या मुलांवरुन दिलेली प्रतिक्रिया अनेकांच्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय आहे.

काय म्हणाला शाहरुख?

मला अनेकजण आर्यन आणि सुहानाच्या बॉलीवूडच्या डेब्यूविषयी विचारत असतात. पण तुम्हाला खरोखर एक गोष्ट सांगतो की, आम्ही कधीही आमच्या मुलांना तुम्ही चित्रपट क्षेत्रात या असे सांगितलेलं नाही. त्यांना जे आवडते त्यांनी ते बिनधास्तपणे करावे असे आमचे म्हणणे होते. तुम्ही अमूक एखाद्या गोष्टीमध्ये करिअर करा असा सल्ला आम्ही दोघांनीही कधीही त्यांना सांगितले नाही.

आर्यनला डायरेक्शन मध्ये रस होता.तो मला म्हणालाही मी त्यातच करिअर करेन. तेव्हा मला त्याचे कौतुक वाटले. सुहानाला अॅक्टिंगमध्ये रस होता. त्यामुळे तिनं त्या क्षेत्राची निवड केली. त्यांनी कुठला निर्णय घ्यावा याचा निर्णय घेण्यास ते सक्षम आहेत. त्यामुळे मला त्यांना काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ते दोघेही मेहनती आहेत. हेही मला तुम्हाला सांगावे लागेल.

मी नेहमीच त्यांच्या पाठीशी....

माझ्या मुलांना मला काही वेगळं सांगावं लागत नाही. त्यांना त्यांच्या आय़ुष्यात काय हवे आहे हे चांगले माहिती आहे. त्यामुळे मी केवळ त्यांना मदतनीसाच्या भूमिकेत असतो. आता कुठे सुहानानं एक चित्रपट केला आहे. त्यामुळे तिला पुढील चित्रपटांमध्ये आपल्याला आणखी काही सुधारणा करावी लागणार हेही तिला माहिती आहे. असेही शाहरुखनं यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com