Jawan Movie: नागपूर पोलिसही 'जवान'च्या प्रेमात! पोस्टर ट्विटवर शेयर करत म्हणाले,...

Jawan Shah Rukh Khan Movie Broke All Records
Jawan Shah Rukh Khan Movie Broke All Records eSAKAL
Updated on

Nagpur Police Tweet On Jawan : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शित होताच सर्वत्र खळबळ उडवली आहे. या चित्रपटाची उत्सूकता प्रेक्षकांना खुप दिवसांपासून होती.

त्यानंतर चित्रपटाचा प्रिव्ह्यूनंतर आलेला ट्रेलर पाहिल्यानंतर तर चाहत्यांची उत्सूकता शिगेला पोहचली होती. अॅटली कुमार दिग्दर्शित 'जवान' चित्रपटाची क्रेझ दुबईच्या बुर्ज खलिफावरही पाहायला मिळाली. आता जवानची भुरळ केवळ चाहत्यांनाच नाही तर पोलिसांनाही पडली आहे.

आता जवानची भुरळ नागपूर पोलिसांनादेखील पडली आहे. त्याच कारण म्हणजे त्यांनी सोशल मीडियावर केलेल ट्विट.

Jawan Shah Rukh Khan Movie Broke All Records
Jawan Movie Review : 'सरकार निवडून देताना हजार वेळा विचार करा!' 'जवान'मध्ये शाहरुखनं केली 'उंगली'

त्याच झालं असं की नागपूर शहर पोलिसांनी त्याच्या ट्विटर हँडलवर शाहरुखच्या जवानचा एक फोटो शेयर केला आहे. या पोस्टरमध्ये त्याचे चित्रपटातील वेगवेगळे लूक दिसत आहेत. यात शाहरुखला ओळखलाही जात नाही.

मात्र त्यांनी हा फोटोतून काही चित्रपटाचे प्रमोशन नाही तर नागरिकांना सायबर क्राईमपासून सुरक्षित ठेवण्यासाठी जनजागृती केली आहे. यात त्यांनी शाहरुखच्या वेगवेगळ्या लूकसारखेच अगदी वेगवेगळे पासर्वड सोशल मीडिया अकाउंट्ससाठी ठेवण्याचे आवाहन केले आहे.

'वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्ससाठी वेगवेगळे पासवर्ड सेट करणं असे असते,' असं त्यांनी या पोस्टरमध्ये लिहिलं आहे. तर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये नागपुर पोलिसांनी लिहिले की, 'जेव्हा तुम्ही अशी पासवर्ड ठेवता, तेव्हा एकही कोणताही फ्रॉडस्टर टिकू शकणार नाही'. सध्या पोलिसांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या पोस्टला अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

Jawan Shah Rukh Khan Movie Broke All Records
Rashmika- Vijay: रश्मिका-विजय लग्नापुर्वीच रहातायत एकत्र! त्या फोटोंमुळे लिव्ह इनच्या चर्चांना उधाण...

तर दुसरीकडे शाहरुखचा जवान हा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड करणार अशी चर्चा आहे. या चित्रपटाची अॅडवान्स बुकिंगही चांगलीच झाली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई करतो हे पहाणे उत्सूकतेचे ठरणार आहे. त्याचबरोबर चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटगृहांमध्ये गर्दी वाढली आहे.

सोशल मीडियावरही लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेकांनी जवानचं कौतुक केलं आहे. या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड केला आहे. हा चित्रपट पहिल्या दिवशी नक्कीच 37 कोटींच्यावर व्यवसाय करेल.

Jawan Shah Rukh Khan Movie Broke All Records
Jawan Leaked Online: शाहरुखच्या जवानला मोठा झटका! पहिला शो होताच एचडी प्रिंटमध्ये 'या' साइट्सवर चित्रपट लीक!

चित्रपटातील कलाकरांबद्दल बोलायचं झाल्यास तर या चित्रपटात शाहरुख खानसोबतच नयनतारा, रिद्धी डोगरा, सान्या मल्होत्रा ​​आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसत आहेत. जवान या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटली कुमार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com