
Jawan Video: 'जवान' चित्रपटाचा सेटवरून व्हिडिओ लीक...शाहरुख खानचा मास लूक रिव्हिल
शाहरुख खान त्याच्या पठाणमुळं चर्चेत होता. त्यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केला. पठाण ने बॉक्स ऑफिसवर 1000कोटींचा टप्पा पार केला आहे. आता शाहरुखच्या आगामी जवाण या चित्रपटाकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. शाहरुखही त्याच्या जवान चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे.
चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात आहे. मात्र त्याआधीच जवान या चित्रपटाची दहा सेकंदांची व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर लीक झाली होती. व्हिडिओमध्ये शाहरुख खान स्टंट करताना दिसत आहे.
दहा सेकंदांच्या व्हिडिओमध्ये शाहरुख सिगारेट ओढताना आणि जबरदस्त फायटिंग सीन करतांना दिसत आहे. व्हिडिओतील शाहरुखचा हा स्टायलिश लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा या चित्रपटात अभिनेत्यासोबत दिसणार आहे.
या व्हिडिओमध्ये शाहरुख खान साऊथच्या चित्रपटांप्रमाणे मास लूकमध्ये दिसत आहे. त्याची अॅक्शनही तशीच आहे. तो ज्या पद्धतीने शत्रूंना हरवत आहे ते पाहून चाहते उत्साहित झाले. हा लूक पाहण्यासाठी चाहत्यांना प्रतीक्षा करणे कठीण झाले आहे. थोड्यावेळातच हा लुक सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
2 जूनला रिलीज होणाऱ्या जवान या चित्रपटाची रिलीज डेट आता वाढवण्यात आली आहे. मात्र, जवानाची ही छोटी क्लिप शाहरुख खानच्या चाहत्यांना भेटच असल्याचं बोललं जात आहे.