John Cena SRK Song : WWE चा जॉन सीना म्हणतोय, शाहरुखचं 'भोली सी सूरत आखो में...' व्हिडिओनं नेटकऱ्यांच्या कमेंटला उधाण!

जॉन सीनाचा (John Cena SRK Song) तो व्हिडिओ नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय आहे. यापूर्वी देखील त्यानं किंग खानची प्रशंसा केली आहे.
John Cena sing shah rukh khan song
John Cena sing shah rukh khan song esakal
Updated on

John Cena Video : किंग खान शाहरुखचे साऱ्या जगभर चाहते आहेत. केवळ भारतच नाही तर जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. अशातच (Shah Rukh Khan News) त्याच्या एका चाहत्यानं सोशल मीडियावर शेयर केलेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आलं आहे.

त्या व्हिडिओमध्ये असं नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत. हॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हे देखील शाहरुखचे चाहते आहेत. ते शाहरुखच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलचे चाहते आहेत. अशातच WWE चा स्टार जॉन सीनाचा एक (John Cena hummed Shah Rukh Khan Bholi Si Surat song ) व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात तो किंग खानच्या दिल तो पागल है मधील गाणं गुणगुणताना दिसतो आहे. त्या व्हिडिओवर आलेल्या कमेंटसही भन्नाट आहेत.

यापूर्वी देखील जॉन सीनानं किंग खानचे कौतुक केल्याचे दिसून आले आहे. मात्र त्याचा आताचा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. त्यानं शाहरुखचं (John Cena Viral Video News) भोली सी सूरत आखो में मस्ती...नावाचं गाणं म्हटलं आहे. शाहरुखचा एक चाहता त्याला ते गाणं म्हणण्यासाठी विनंती करतो आणि जॉन सीना ते गाणं म्हणू लागतो असे त्या व्हिडिओमध्ये दिसते.

इंस्टावरुन व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी जॉन सीनाचं कौतुक करत त्याला धन्यवाद दिले आहे. काहींनी त्याला (Latest Entertainment News) बॉलीवूडमधील शाहरुखचे गाणे म्हटल्याबद्दल त्याच्या मोठेपणाची स्तुतीही केली आहे. शाहरुखच्या एका फॅन पेजमाध्यमातून तो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे.

John Cena sing shah rukh khan song
Dunki On OTT : शाहरुखचा 'डंकी' ओटीटीवर रिलीज झाला! किंग खाननं 'व्हॅलेंटाईन'चं चाहत्यांना दिलं मोठं गिफ्ट

शाहरुखच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याचा डंकी नावाचा चित्रपट खास व्हॅलेंटाईनच्या निमित्तानं नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या काळात किंग खान केजीएफ फेम यशच्या टॉक्सिक नावाच्या चित्रपटामध्ये कॅमिओ करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र याबाबत मेकर्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com