दिवाळीनिमीत्त शाहरुखची नवी जाहिरात; लोकल दुकानदारांसाठी झाला व्होकल

शाहरुखची ही जाहिरात सध्या चांगलीच चर्चेत आहे.
 Shahrukh Khan
Shahrukh Khansakal
Updated on

बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान अडचणींचा सामना करत आहे. मुलगा आर्यन खान मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात अडकल्यापासून शाहरूख खानसुद्धा तणावात असल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वीच तो आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये गेला होता. शाहरुखने आपल्या मुलाशी येथे सुमारे 15 मिनिटे चर्चा केली. या भेटीदरम्यान तो खूपच नाराज असल्याचं दिसत होतं. आपल्या आवडत्या अभिनेत्याला या संकटातून लवकर बाहेर पडता यावं यासाठी चाहते सतत प्रार्थना करताना दिसताय. या दरम्यानच शाहरुख खानची एक नवीन जाहिरात रिलीज झाली आहे. यामध्ये तो दिवाळीनिमित्त लोकांना खास संदेश देताना दिसतोय.

'ही फक्त कॅडबरीची जाहिरात नाही'

शाहरुख खानची नवी कॅडबरीची जाहिरात रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. या जाहिरातीची पंच लाईन 'ही फक्त कॅडबरीची जाहिरात नाही' अशी आहे. या जाहिरातीद्वारे शाहरुख खान प्रत्येक घराची दिवाळी गोड करण्याचे आवाहन करताना दिसतोय. लॉकडाऊनमध्ये लहान व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे दिवाळीची खरेदी घराजवळच्या दुकानातूनच करा. तुम्ही तुमच्या घराजवळच्या दुकानातून कपडे, शूज, चष्मा इत्यादी खरेदी करून त्यांची दिवाळी गोड करा असं आवाहन या जाहिरातीमधून करण्यात आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com