Pathaan: ऐपत नाही तरी पाकिस्तानला पाहायचाय 'पठाण'! विकले जात आहेत महागडे तिकीट

Pathaan: आर्थिक मंदीत पाकिस्तानला पाहायचा 'पठाण'..शाहरुख खानच्या 'पठाण' चं टिकीट पाकिस्तानात 900 रुपयांना
Pathaan
Pathaan esakal

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या 'पठाण' चित्रपटाची जादू ही बॉक्स ऑफिसवर दिसतच आहे. यावरुन चित्रपटाची क्रेझ दिसून येत आहे. या चित्रपटाने 7 दिवसात जगभरात 634 कोटींची कमाई केली आहे. तर भारतात या चित्रपटाची कमाई लवकरच ४०० कोटींचा गल्ला जमवेल असं दिसून येत आहे.

Pathaan
Pakistani Actress On Pathaan : 'आमच्या पाकिस्तानात तर शाहरुख खानला...' अभिनेत्री बोलून फसली!

दरम्यान, पाकिस्तानत सध्या आर्थिक परस्थीती चांगली नाही. देश आर्थिक मंदीच्या सावटात असतांनाही पाकिस्तानात पठाण चित्रपट पाहण्यासाठी शाहरखचे चाहते आतुर असल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तानमध्ये 'पठाण' चित्रपट बेकायदेशीरपणे दाखवला जात असल्याची बातमी समोर आली आहे.

इतकच नाही तर चित्रपटाचे तिकीट ९०० रुपयांना विकले जात आहे. पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी असल्याची माहिती आहे. ही बंदी 4 वर्षांपूर्वी लागू करण्यात आली होती. मात्र पाकिस्तानही शाहरुखच्या चाहत्यांची सख्या कमी नाही यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी ते काहीही करण्यास तयार आहेत आणि त्यामुळे येथे हा चित्रपट बेकायदेशीरपणे दाखविला जात आहे.

पाकिस्तानात भारतीय चित्रपटांवर बंदी असतानाही 'पठाण' छुप्या पद्धतीने दाखवला जात आहे. जेव्हा 'पठाण'च्या क्रेझची बातमी पाकिस्तानातील लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांना विरोध करता आला नाही आणि त्यांनी गुपचूप चित्रपट पाहण्याचा मार्ग शोधला.

Pathaan
Pathaan: बजेटच्या वर कमाई करताच शाहरुख देणार गूडन्यूज 'पठाण'ची तिकिटे होऊ शकतात स्वस्त!
pathaan   Pakistan
pathaan Pakistan

पाकिस्तानमध्ये हा चित्रपट बेकायदेशीरपणे दाखवण्याची तयारी सुरू आहे. फेसबुक पेजवरही चित्रपटाची तिकिटे विकली जात आहेत. 4 आणि 5 फेब्रुवारीला दोन शो चालवले जातील असा दावा केला जात आहे. कराचीतील डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Pathaan
Pathaan Box Office Collection Day 7: 'पठाण' ची घोडदौड सातव्या दिवशी मंदावली! मात्र तरीही कमावला इतक्या कोटींचा गल्ला...
pathaan   Pakistan
pathaan Pakistan

फायरवर्क इव्हेंट्स नावाचे एक फेसबुक पेज आहे ज्यावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची जाहिरात केली आहे. लोकांना टिकर खरेदी करण्यास सांगणारी पोस्ट गेल्या चार दिवसांत या पेजवरून चार वेळा शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये शेअर केलेल्या पोस्टरवर फोन नंबर दिले आहेत, ज्याद्वारे पुढील माहिती दिली जात आहे. दोन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पेजने लिहिले आहे की, उत्तम प्रतिसादामुळे ते 5 फेब्रुवारीलाही चित्रपटाचे दोन शो चालवतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com