Pathaan Movie: पैशाला नाय तोटा पठाणचा आनंद मोठा! अडीच हजारांना एक तिकिट, तरीही... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathaan Movie Housefull

Pathaan Movie: पैशाला नाय तोटा 'पठाण'चा आनंद मोठा! अडीच हजारांना एक तिकिट, तरीही...

शाहरुख खानचा ‘पठाण’ येत्या बुधवारी २५ तारखेला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच धूमाकूळ घालत आहे. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग तुफान वेगाने सुरू आहे. पठाण चित्रपटातून 4 वर्षांनंतरशाहरुख रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. शाहरूखच्या चाहत्यांना त्याला पडद्यावर पाहण्याची इच्छा आहे.

हेही वाचा: Pathaan Controversy: पुण्यात बजरंग दलाचा राडा! 'पठाण'चं पोस्टर फाडलं...

किंग खानचे चाहते त्याला पाहण्यासाठी हजारो रुपयांची तिकीटं खरेदी करत आहेत. यावरून शाहरुख खानची किती क्रेझ आहे. याचा अंदाज येऊ शकतो. 20 जानेवारीपासून पठाणचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यापासून चित्रपटाच्या तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत.

हेही वाचा: Pathaan Movie Release : दर दुप्पट असूनही ‘पठाण’ नाशिकमध्ये हाउसफुल्ल!

राजधानी दिल्लीतील काही मल्टिप्लेक्समध्ये तर चक्क पठाणचे तिकीट 2100 रुपयांपर्यंत विकले जात आहे. याशिवाय काही चित्रपटगृहांमध्ये मॉर्निंग शोची तिकिटेही 1000 रुपयांपर्यंत विकली जात आहेत. इतकी महाग तिकिटे असूनहीशाहरुखच्या 'पठाण'नं आगाऊ बुकिंगंचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे. 'पठाण'च्या हिंदी आणि तेलुगू व्हर्जनच्या तिकीटांची सर्वाधिक विक्री होत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 14.66 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

हेही वाचा: Pathaan Movie: 'पठाण' रिलीज होण्यापूर्वी शाहरुखची हवा! मन्नत बाहेर चाहत्यांची जत्रा

इतकेच नव्हेतर गुरुग्राममधील अॅम्बियन्स मॉलमध्ये पठाणचे तिकीट 2400, 2200 आणि 2000 रुपयांना विकले जात आहे. इतके महागडे तिकीट असूनही सर्व शो फुल झाले आहेत. त्यामुळं चाहत्यांचं शाहरुखवर खूप प्रेम आहे हे मान्य करावे लागेल. पठाणबाबत सुरू असलेल्या वादाचाही चाहत्यांवर काहीही परिणाम झाला नसल्याचं दिसत आहे.

हेही वाचा: Pathaan Ticket Sales Record : पठाणनं तोडलं 'बाहुबली 2' चं रेकॉर्ड! किंग खानचं वादळ घोंघावणार?

पठाण २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. शाहरुख पठाणमध्ये दीपिका पदुकोणवर रोमान्स करताना दिसणार आहे. यात जॉन अब्राहमही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता रिलीजनंतर पठाण किती रेकॉर्ड करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.