
Shah Rukh Khan: 'उमराह' करण्यासाठी शाहरूख खानची मक्का मदिनाला भेट
बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानने ३ वर्षा नंतर पुन्हा कमबॅक केले आहे. आता शाहरूखच्या पदरात चक्क तीन चित्रपट आहेत. शाहरूख खानच्या वाढदिवशी 'पठाण' चित्रपटाचा पहिला लुक रिलीज झाला होता. आता शाहरूख त्याच्या 'डंकी' या चित्रपटाच्या शुटिंगसाठी सौदी अरेबिया मध्ये आहे. या निमित्ताने शाहरूखने सौदी अरेबियातील इस्लाम धर्मीयांचे पवित्र स्थान असणाऱ्या मक्का मदिनाला भेट दिली.
(Shah Rukh Khan Performs Umrah In Mecca Post Schedule Wrap Of Dunki)
दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी शाहरुख आणि सर्व टीम सौदीमध्ये गेले होते. या चित्रपटाचं सौदीमधील चित्रीकरण पूर्ण झाल्यावर त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत या सर्वांचे आभार मानले. याचा एक व्हिडिओ शाहरुखने पोस्ट केला होता. या व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये शाहरुखच्या सौदीमधील चाहत्यांनी त्याने मक्का येथे जाऊन ‘उमराह’ करावा अशी विनंती केली होती.
आणि चक्क शुटिंग संपताच शाहरुखानने मक्काला भेट दिली. येथील व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये किंग खान इस्लामिक तीर्थयात्रा उमराह (प्रार्थना) करताना दिसत आहे. यामध्ये शाहरुख पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे, जो त्याच्या चाहत्यांसाठी नवीन आहे शाहरूखान अश्या लूकमध्ये कधी दिसला नाही. शाहरूखचे हे रूप प्रथमच दिसून आले, असून त्याचे सौदीतल चाहते त्याच्यावर प्रचंड खुश आहेत.
शाहरुख खानचा चित्रपट 'पठाण' जानेवारी 2023 मध्ये मोठ्या पडद्यावर येणार आहे. दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका असलेला हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो 'जवान' आणि 'डंकी'मध्ये दिसणार आहे. हे दोन्ही सिनेमे 2023 मध्येच रिलीज होणार आहेत.