Shah Rukh Khan: ‘झुमे जो रिंकू', शाहरुखनं कौतुक करताच क्रिकेटर झाला क्लिन बोल्ड

शाहरुखने रिंकूचा खास अंदाजातील एक फोटो शेअर करत त्याचं तोंडभरून कौतुक केलं.
shah rukh khan and rinku singh
shah rukh khan and rinku singhSakal

Shah Rukh Khan: आयपीएलमध्ये रविवारी कोलकाता नाइट रायडर्सने गुजरात टायटन्सच्या घोडदौडीला लगाम घातला. रिंकू सिंहने अखेरच्या षटकात मारलेल्या पाच सिक्सच्या जोरावर हा विजय मिळवता आला.

रशीद खानची गुजरातकडून हॅटट्रिक (37 धावांत 3 विकेट्स) व्यर्थ गेली. आधी बॅटिंग करत गुजरात टायटन्सने 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 204 अशी धावसंख्या उभारली होती. नंतर कोलकाताचा डाव रशीद खानच्या फिरकीसमोर अडखळला.

पण अखेरच्या ओव्हरमध्ये रिंकूच्या फटकेबाजीने कोलकाताचा विजय साकार झाला. कोलकाताने 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 207 धावा केल्या. केकेआरच्या या शानदार विजयाने टीमचा मालक शाहरुख खान खूप खूश आहे आणि त्याने टीमसोबत रिंकू सिंगसाठी एक मोठी गोष्ट लिहिली आहे. (Latest Marathi News)

शाहरुख खानने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्याच्या आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयासंदर्भात लेटेस्ट ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये किंग खानने 'पठाण' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये त्याच्या जागी रिंकू सिंगचा फोटो समाविष्ट केला आहे. यासोबतच शाहरुखने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की-

झूम जो रिंकू माय बेबी, नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर तुम्ही अप्रतिम आहात. आणि हो नेहमी लक्षात ठेवा की विश्वास ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे अभिनंदन. अशाप्रकारे शाहरुख खानने केकेआरच्या विजयावर आनंद व्यक्त करत युवा फलंदाज रिंकू सिंगचे कौतुक केले. (Marathi Tajya Batmya)

shah rukh khan and rinku singh
Priyanka Chopra: प्रियांकाने अशा प्रकारे मुलगी मालतीसोबत साजरा केला ईस्टर! अभिनेत्रीने सेलिब्रेशनचे फोटो केले शेअर

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्याच्या काही दिवस आधी, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने IPL (Ipl 2023) मध्ये ईडन गार्डन्स येथे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सामना खेळला.

हा सामना पाहण्यासाठी, शाहरुख खान त्याची मुलगी सुहाना खानसह कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर उपस्थित होता यादरम्यान किंग खानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com