शाहरुखचा 'झिरो' झळकला; पण कुणालाच नाही आवडला! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'झिरो' आज देशभरात झळकला. पण कट्टर शाहरुखप्रेमी वगळता अन्य चित्रपट समीक्षक आणि रसिकांना हा चित्रपट फारसा भावलेला नाही, असेच सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवरून दिसत आहे. 

आनंद एल. राय दिग्दर्शित 'झिरो'कडून शाहरुखला मोठ्या आशा होत्या. या चित्रपटात शाहरुखने बुटक्‍या माणसाची भूमिका केली आहे. शाहरुखशिवाय या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि कॅतरिना कैफच्या प्रमुख भूमिका आहेत. 

आनंद एल. राय यांच्याबरोबर शाहरुखने प्रथमच काम केले असल्याने या चित्रपटाविषयी उत्सुकता होती. शाहरुखचे यापूर्वीचे काही चित्रपट सलग फ्लॉप झाल्यामुळे त्यालाही एका 'सुपरहिट'ची नितांत गरज होती. पण चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी बहुतांशी नकारात्मक प्रतिक्रिया उमटली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shah Rukh Khan s Zero fails to impress audience