Jawan Gaiety Galaxy: माहिमच्या गैटी गॅलेक्सी थिएटरबाहेर फॅन्सचा जल्लोष, ढोल ताशांवर नाचत जवानचं यश साजरं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shah Rukh Khan's  jawan Fans Celebrate Outside Mumbai Gaiety Galaxy theatre As Jawan ₹1000 cr

Jawan Gaiety Galaxy: माहिमच्या गैटी गॅलेक्सी थिएटरबाहेर फॅन्सचा जल्लोष, ढोल ताशांवर नाचत जवानचं यश साजरं

Jawan Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या जवान सिनेमाने बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई केलीय. शाहरुख खानची बायको गौरी खान जवानचे बॉक्स ऑफीस रिपोर्ट सातत्याने शेअर करत असते.

शाहरुख खानच्या जवान सिनेमा लवकरच १००० कोटी क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे. पण त्याआधीच शाहरुखच्या फॅन्सनी माहिमच्या आयकॉनिक गैटी गॅलेक्सी थिएटरबाहेर सेलिब्रेशन केलंय.

शाहरुखच्या फॅन्सचं अनोखं सेलिब्रेशन

आज रविवारी 24 सप्टेंबरला जवानचा बॉक्स ऑफिसवरील यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील प्रतिष्ठित गैटी गॅलेक्सी चित्रपटगृहाबाहेर शाहरुखचे असंख्य चाहते जमले.

अ‍ॅक्शन-एंटरटेनर जवान जागतिक स्तरावर रु. 1000 कोटींच्या जवळ जात असताना, चाहते मुंबई थिएटरच्या बाहेर मॅचिंग 'जवान' टी-शर्ट घेऊन आले आणि ढोल ताशाच्या तालावर बेभान नाचले.

याफॅन्सच्या हातात 'वुई लव्ह जवान' पोस्टर्सही होते. चाहत्यांनी सुपरस्टारसाठी घोषणाबाजीही केली.

जवान ऑस्करला जाणार का? अॅटली म्हणाला

जवानच्या ऑस्कर एन्ट्री बद्दल अॅटली पुढे म्हणाला, "नक्कीच! मलाही जवानला ऑस्करमध्ये घेऊन जायला आवडेल. बघूया. मला वाटते शाहरुख खान सर ही मुलाखत पाहतील आणि वाचतील. मी त्यांना फोन करून विचारेन की, सर, हा चित्रपट ऑस्करमध्ये नेऊ का?"

अशाप्रकारे जवान सिनेमाने ऑस्करमध्ये एन्ट्री घ्यावी अशी दिग्दर्शक अॅटलीची इच्छा आहे. याविषयी तो शाहरुख खानशी सुद्धा बोलणार आहे. जवान ऑस्करला गेला तर भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.

शाहरुख खानच्या जवानने बॉक्स ऑफीसवर केला रेकॉर्ड

शाहरुख खानच्या जवानने बॉक्स ऑफीसवर ४०० कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय. जवान भारतात ४९३ कोटी कमाई केलीय.

याशिवाय जवानने जगभरातुन आतापर्यंत ८५८ कोटींची कमाई केलीय. जवानने बॉक्स ऑफीसवर 979.08 कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय.