
Pathan Beats Bahubali 2: पठाण ठरला 'बाहुबली'! राजामौलींच्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला!
'पठाण' हे सध्या गाजणार नाव आहे.शाहरुखचा चित्रपट त्यात चार वर्षानंतर त्याची मोठ्या पडद्यावर एंट्री होती. त्याचे चाहते त्याच्या या चित्रपटासाठी खुप उत्सुक होते मात्र ज्यावेळी या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी रिलिज झाली तेव्हा देशभरात वेगळं वादळ निर्माण झालं.
अनेक वाद झाले इतकच नाही तर शाहरुखला जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र शाहरुखही बादशाहच तो कुठे मागे पडणार. पठाण चित्रपटाने अगदी रिलिजच्या आधीपासूनच रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली आणि अजूनही तो सुरुच आहे.
शाहरुखच्या पठाणने 'बाहुबली 2' च्या हिंदी आवृत्तीचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ट्विट करून चित्रपटाच्या कमाईबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सिद्धार्थने लिहिले की, हा त्याच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.
त्यांनी लिहिले, 'बाहुबली 2'च्या हिंदी आवृत्तीचे लाईफ टाईम कलेक्शनचा रेकॉर्ड तुटला आहे. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. चित्रपटाला इतकं प्रेम देणाऱ्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आभार.

पठाणच्या बॉक्स ऑफिसच्या कमाईच्या आकड्यावर नजर टाकली तर गुरुवारी म्हणजे रिलीजच्या 37 व्या दिवशी, 'पठाण' च्या हिंदी आवृत्तीने भारतात 75 लाख रुपयांची कमाई केली आणि भारतात त्याची एकूण कमाई 510.55 कोटी रुपये झाली.
तर शुक्रवारी, चित्रपट सुमारे 70 लाख रुपयांची कमाई करेल अशी आशा होती. सकाळ आणि दुपारच्या शोने 511 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याची माहिती मिळाली आहे.
आता "बाहुबली 2" च्या हिंदी व्हर्जनच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास बाहुबली 2' ने 2017 मध्ये रिलीज झाल्यावर त्याच्या हिंदी आवृत्तीसह 510.99 कोटी रुपये कमावले होते. यानंतर आता हा हिंदीतील देशांतर्गत बाजारात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. आता हा रेकॉर्ड 'पठाण'ने मोडला आहे.
तर याबद्दल व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीही ट्विट करत माहिती दिली आहे. त्याने या ट्विटमध्ये भारतातील टॉप 4 चित्रपटांचे नावं सांगितली आहेत. ज्यात पहिल्या स्थानावर पठाण तर दुसऱ्या स्थानावर बाहूबली२ आहे. तिसऱ्या स्थानावर रॉकी भाईचा केजीएफ२ आहे. तर चौथ्या स्थानावर आमिर खानचा दंगल चित्रपटाचा सामावेश आहे.