esakal | आर्यनला धीर देण्यासाठी 'आई' येणार कोर्टात
sakal

बोलून बातमी शोधा

आर्यनला धीर देण्यासाठी 'आई' येणार कोर्टात

आर्यनला धीर देण्यासाठी 'आई' येणार कोर्टात

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: ड्रग्ज प्रकरणात (drugs case) NCB च्या अटकेत असलेल्या आर्यन खानच्या (aryan khan) जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. आर्यनच्या सुनावणीला त्यांची आई गौरी खान (Gauri khan) कोर्टात उपस्थित राहील. गौरी खान वांद्र्यातील मन्नत बंगल्यावरुन (mannat bunglow) कोर्टात जाण्यासाठी निघाली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आर्यनची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे.

प्रसिद्ध वकिल सतीश मानशिंदे आर्यनची बाजू कोर्टात मांडतील. आर्यनला कोर्टात नेण्यात आले असून एनसीबीचे अधिकारी त्याच्यासोबत आहेत. "एनसीबी आर्यन खानची आणखी कोठडी वाढवून मागेल. आतापर्यंतच्या चौकशीतून काय माहिती समोर आलीय, ते आता सांगणार नाही. पण काही बाबतीत तपास होणं आवश्यक आहे" असे एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे म्हणाले.

हेही वाचा: Drug case: आर्यनसोबत तुरुंगात असलेले अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा कोण आहे?

मुंबईच्या किनाऱ्याजवळ (Mumbai coast) कॉर्डेलिया क्रूझवर रेव्ह पार्टी (rave party) सुरु असताना शनिवारी NCB ने छापा मारला. या कारवाईतून बॉलिवूड आणि ड्रग्जचं (Drugs) कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खानला पोलिसांनी अटक केली आहे. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा सुद्धा अटकेत आहे. NCB ने कॉर्डेलिया क्रूझवरुन १३ ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस, २२ एमडीएमएच्या २२ गोळ्या जप्त केल्या आहेत.

loading image
go to top