'शाहरुखचा बाजीगर चालतो पण, कबीर सिंग नाही', भडकला शाहिद

वृत्तसंस्था
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

नुकत्यात पार पडलेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेवमध्ये शाहिदने अखेर मौन सोडलं आणि 'कबीर सिंग'वर झालेल्या टीकेवर उत्तर दिलं.

मुंबई : संदिप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'कबीर सिंग' ने बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई केली. रेकॉर्ड तोडत या चित्रपटाने जवळपास तीनशे कोटींची कमाई केली. शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांचा हा चित्रपट 'अर्जुन रेड्डी' चा हिंदी रिमेक आहे. एकीकडे 'कबीर सिंग' ला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी दुसरीकडे त्याला प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं. शाहिद कपूरने साकारलेली भूमिका ही बिन्धास्त अशी होती आणि त्याच्या व्यवसायाचा विचार करता अनेकांनी त्याला विरोध केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

नुकत्यात पार पडलेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेवमध्ये शाहिदने अखेर मौन सोडलं आणि त्याने साकारलेल्या व्यक्तीरेखेविषयी स्पष्टीकरण दिलं. आतापर्यंत झालेल्या टीकेवर सडेतोड उत्तर देताना तो म्हणाला,' तुम्हाला काय वाटतं कोणताही चित्रपट ही कोणी शैक्षणिक संस्था आहे का जी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगेल काय करावं आणि काय करु नये. ती सर्वस्वी तुमची मर्जी आहे. चित्रपट हा एखाद्या आरशाप्रमाणे वास्तव आणि जीवनाचं चित्र तुमच्यासमोर ठेवतो. 'कबीर सिंग' हा अडल्ट चित्रपट आहे जो अडल्ट लोकांसाठी बनला आहे. ज्यांना योग्य आणि अयोग्य काय आहे यातला फरक समजतो.'

मला तुम्ही हे सांगत आहात का की, मिस्टर बच्चन (अमिताभ बच्चन) कोणाला चोर बनण्याचा सल्ला देत आहेत? तुम्ही चित्रपट बघायला जाताय हे तुम्हाला माहितेय आणि तो काल्पनिक आहे. कपल एकामेकांशी भांडतानाची अनेक उराहरणे मी स्वत: पाहिली आहेत. जेव्हा तिसरा व्यक्ती ते बघतो तेव्हा त्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण अस असलं तरी ते कपल पूर्णपणे प्रेमात असतात. अशा प्रकारचं स्पष्टीकरण शाहिदने त्यावेळी दिलं. 

पुढे तो म्हणाला,' प्रत्येक कबीरला त्याच्या जीवनात एका प्रितीची गरज असते. 'बाजीगर' मध्ये जेव्हा शाहरुख शिल्पा शेट्टीला मारतो त्याविषयी कोणी बोलत नाही. 'संजू' मध्ये सोनम कपूरच्या मानेला धरून जेव्हा तिला कमोड सीटमध्ये ढकलल जातं त्याविषयी कोणाचा आक्षेप नाही. मग सर्वजण कबीरच्या मागे का लागले आहेत? ' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

अशाप्रकारे टीका करणाऱ्यांना उलट सवाल शाहिदने केला आहे आणि आतापर्यंत झालेल्या विरोधाला त्याने सडेतोड उत्तर दिलं आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahid Kapoor defends Kabir Singh again and targets Shah Rukh Khan and Ranbir Kapoor s films