
किंग खान शाहरुखने त्याच्या चाहत्यांसाठी या लॉकडाऊन दरम्यान एक उत्तम संधी आणली आहे. शाहरुखने एक स्पेशल टास्क त्याच्या चाहत्यांना दिला आहे. आणि या टास्कच्या विजेत्यांना मिळणार आहे शाहरुखसोबत व्हिडिओ कॉलवर बोलण्याची संधी.
मुंबई- कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. मार्चमध्ये येऊन ठेपलेल्या या जागतिक संकटामुळे घरात बसून आता दोन महिने होत आलेत. त्यामुळे सगळेच कंटाळले आहेत. त्याच त्याच गोष्टी दररोज करुन लोकं हैराण झाली आहेत. असं असलं तरी सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी तयारंच आहेत. त्यातंच किंग खान शाहरुखने त्याच्या चाहत्यांसाठी या लॉकडाऊन दरम्यान एक उत्तम संधी आणली आहे. शाहरुखने एक स्पेशल टास्क त्याच्या चाहत्यांना दिला आहे. आणि या टास्कच्या विजेत्यांना मिळणार आहे शाहरुखसोबत व्हिडिओ कॉलवर बोलण्याची संधी..फक्त त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे.
हे ही वाचा: अभिनेत्री पूनम पांडेला पोलिसांनी केली अटक, लॉकडाऊनमध्ये करत होती असं काही...
शाहरुख खानने त्याच्या सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने स्पुक एसआरके या हॅशटॅग अंतर्गत एक चॅलेंज दिलं आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये अनेकांकडे खूपंच रिकामा वेळ आहे आणि या रिकाम्या वेळेत अनेकांची चांगली क्रिएटीव्ही देखील दिसून येत आहे. त्यामुळे हे चॅलेंज तो त्याच्या चाहत्यांसाठी घेऊन आला आहे.
शाहरुखने याविषयी ट्वीट करत लिहिलं आहे, क्वारंटाईन दरम्यान सध्या अनेकजणांकडे पुरेसा वेळ आहे म्हणूनंच मी तुमच्यासाठी एक छोटंसं काम घेऊन आलो आहे पण थोड्या मजेशीर, क्रिएटीव्ह आणि भितीदायक अंदाजात ते आपण पूर्ण करुया. सध्या मिळालेल्या या वेळेत आपण अनेक शो, सिरीच आणि सिनेमे पाहत आहोत. तेव्हा स्वतःमधील फिल्ममेकर जागा करा आणि एक घरातल्या घरात फिल्म शूट करा असं शाहरुखने त्याच्या पोस्टमधून सांगितलं आहे.
Since we’ve all got a bit of time on our hands in quarantine, thought I can get us all to work a bit... in a fun, creative and... spooky way! #SpookSRK
Read on for more details. pic.twitter.com/MNh8Osq3ND— Shah Rukh Khan (@iamsrk) May 9, 2020
यात त्याने याबद्दलची नियमावलीही दिली आहे. विशेष म्हणजे १८ पर्यंत तुम्ही ही फिल्म पोस्टमध्ये दिलेल्या आयडीवर मेल करायची आहे आणि यातून जे तीन जण विजेते ठरतील त्यांना शाहरुख खानसोबत व्हिडिओ कॉलवर बोलण्याची संधी मिळणार आहे. चला तर मग कामाला लागा.
shahrukh khan gave special task for fans