शाहरुखचा 'मन्नत' डायमंडनं सजला, बंगल्याबाहेर रोजपेक्षा दुपटीनं वाढली पाहणाऱ्यांची गर्दी... Shahrukh Khan Mannat New Nameplate | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahrukh Khan Mannat New Diamond studded nameplate for mannat photo viral

Viral Photo: शाहरुखचा 'मन्नत' डायमंडनं सजला, बंगल्याबाहेर रोजपेक्षा दुपटीनं वाढली पाहणाऱ्यांची गर्दी...

Shahrukh Khan 'Mannat' Viral Photo: बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान रियल लाइफमध्ये देखील बादशहा आहे. 'किंग ऑफ रोमान्स' शाहरुख खान,आज ज्या ठिकाणी पोहोचलाय,तिथे पोहोचण्याचा लोक कल्पनेतही विचार करत नाहीत. शाहरुख आजच्या घडीला लक्झुरियस लाइफ जगताना दिसतो. शाहरुखसोबत त्याचा आलिशान बंगला 'मन्नत' आणि बंगल्याची नेमप्लेट देखील नेहमी चर्चेत पहायला मिळते. आता पुन्हा एकदा मन्नतच्या नेमप्लेटवर लोकांच्या नजरा खिळल्या आहेत.(Shahrukh Khan Mannat New Diamond studded nameplate, photo viral)

हेही वाचा: Raj Kundra Made Adult Films: राज कुंद्रा फसणार!, मुंबई पोलिसांच्या 450 पानी चार्जशीटमधून मोठे आरोप

चाहत्यांसाठी शाहरुख खानचा बंगला मन्नत म्हणजे पर्यटन स्थळ असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. मुंबईत राहणारे आणि तिथं लांबून फिरायला येणारे लोक हमखास शाहरुखच्या बंगल्यासमोर उभं राहून पोझ देत आपला एक तरी फोटो क्लिक करतात. शाहरुखच्या बंगल्यासोबतच त्याच्या घराची महागडी नेमप्लेट नेहमीच 'टॉक ऑफ द टाऊन' असते. आता पुन्हा एकदा शाहरुखच्या मन्नत बाहेर नवीन नेमप्लेट लावली गेली आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याच्या गेट च्या बाहेर दोन्ही बाजूला नेमप्लेट लावलेल्या सध्या दिसत आहेत. मन्नतच्या गेटचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रात्रीच्या काळोखात मन्नतची ही नेमप्लेट आकाशात चमचम करणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे चमकताना दिसत आहे.

शाहरुख खानच्या फॅन क्लब पेजवर मन्नतच्या नवीन नेमप्लेटचे आणि बंगल्याच्या गेटचे फोटो शेअर केले गेले आहेत. फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं आहे की-'२ महिन्यानंतर मन्नतच्या गेटचा नवा डिझाइन केलेला लूक समोर आला आहे आणि तो खूप शानदार आहे'. चाहते मन्नतच्या हिऱ्यांनी जडलेल्या नव्या नेमप्लेटसोबत फोटो काढून सोशल मीडियावर ते शेअर करताना दिसत आहेत. नवीन नेम प्लेटच्या ते अक्षरशः प्रेमात पडलेले दिसत आहेत.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

यावरनं इतकं तर नक्कीच लक्षात येतं की शाहरुख फक्त बॉलीवूडचा किंग नाही तर तो आपल्या आयुष्यातही एखाद्या किंगसारखाच जगतो. त्याचं स्टारडम कोणापसून कधीच लपलेलं नाही.

शाहरुख खानच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच 'पठाण' सिनेमातून दिसणार आहे. हा सिनेमा जानेवारी २०२३ मध्ये रिलीज होत आहे. त्यानंतर शाहरुखचा 'जवान' सिनेमाही रिलीज होतोय. तसंच सलमानच्या 'टाइगर ३' मध्ये देखील त्याची एक म्हत्त्वपूर्ण भूमिका आहे.