Shahrukh Khan: नवीन वर्षात शाहरुखचा पुन्हा धमाका! हे दोन सुपरहिट सिनेमे पुन्हा होणार रिलीज

पठाणसोबत धमाकेदार वर्षाची सुरुवात करणाऱ्या किंग खानच्या जवान चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्डच मोडले होते.
shahrukh khan
shahrukh khanEsakal

shahrukh khan Movie: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा सध्या त्याच्या डंकी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा शाहरुखचा 2023 सालचा तिसरा हिट सिनेमा होता. शाहरुख खानसाठी 2023 हे वर्ष खुपच खास ठरलं. त्याचे या वर्षी रिलिज झालेले तीन सिनेमे सुपरहिट ठरले तर दुसरीकडे त्याच्या लेकीने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

पठाणसोबत धमाकेदार वर्षाची सुरुवात करणाऱ्या किंग खानच्या जवान चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्डच मोडले. तर आता पुन्हा शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

शेवटचे मोठे चित्रपट सालार आणि डंकी ख्रिसमसला थिएटरमध्ये प्रदर्शित झाले झाल्यानंतर आता संथ झालेल्या चित्रपटगृहांमध्ये पुन्हा शाहरुख खानचा पठाण आणि जवान चित्रपट प्रेक्षकांना दाखवण्यात येणार आहे.

shahrukh khan
Surbhi Jyoti Wedding: सुरभी ज्योती लवकरच म्हणणार 'कुबूल है'? कुणासोबत बांधणार लग्नगाठ?

बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या पठाण आणि जवान या दोन्ही चित्रपटांचे शो शुक्रवारपासून चित्रपटगृहांमध्ये वाढवण्यात आले आहेत.

पठाण आणि जवान पुन्हा रिलीज झाल्यामुळे आता पुन्हा चित्रपटगृहात शाहरुखचा जलवा दिसणार आहे.

शाहरुखचा डंकी चित्रपट अजूनही थिएटरमध्ये असून त्याची चांगली कमाई होत आहे. जगभरात ४२५ कोटींहून अधिक कमाई करून हा चित्रपट सुपरहिट झाला आहे. आता शाहरुखचे तीन मोठे हिट सिनेमे एकाच वेळी थिएटरमध्ये दिसणार आहे.

shahrukh khan
Priyadarshini Indalkar: "मी सावित्रीबाईंची चिरी लावून गेले आणि..", प्रियदर्शनीची पोस्ट चर्चेत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख या महिन्याच्या शेवटी त्याच्या 3 नवीन चित्रपटांची घोषणा करणार आहे. किंग खान सध्या लंडनमध्ये कुटुंबासोबत सुट्टी घालवत आहे. तिथून परतल्यानंतर किंग खान या चित्रपटांची घोषणा करू शकतो. शाहरुख सलमान खानसोबत यशराजचा स्पाय चित्रपट 'टायगर व्हर्सेस पठाण' घेऊन येणार आहे. यासोबतच तो अॅटलीसोबत तो 'जवान 2'मध्येही दिसणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com