'वोग इंडिया'च्या मुखपृष्ठावर झळकली सुहाना खान; नेटकऱ्यांना पडला प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

सुहाना सध्या शिक्षण घेत आहे. ती बॉलिवूडशी निगडीत कोणत्या प्रोजेक्टचाही भाग नाही. तरी सुहाना 'वोग इंडिया' सारख्या प्रतिष्ठीत मासिकासाठी फोटोशूट करते म्हणजे तिने असं काय मिळवलं आहे? असं म्हणून सुहानाला इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर दिल्या जाणाऱ्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. 

बॉलिवूड मध्ये अधूनमधून नेपोटिझिमचा मुद्दा तोंड वर काढत असतो. आताही हा मुद्दा सध्या चर्चेत आहे तो म्हणजे अभिनेता शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खानमुळे. गेल्या काही दिवसांपासून सुहाना तिच्या सोशल मिडीयावरील फोटोज् मुळे चर्चेत आहे. तिच्या बॉलिवूडमधील एन्ट्रीचीही चर्चा रंगतच असते. सुहाना आता एका प्रसिध्द मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली आहे. 'वोग इंडिया' असं त्या मासिकाचं नाव आहे. शाहरुख खाननेही तिच्यासाठी सोशल मिडीयावरुन आनंद व्यक्त केला आहे.

 

'वोग इंडिया'च्या मुखपृष्ठावर झळकण्यासाठी सुहानाने असे काय केले आहे? असा प्रश्न सध्या नेटकरी विचारत आहेत. सोबतच घराणेशाहीचं उदाहरण म्हणूनही नेटकऱ्यांनी या मुखपृष्ठाबाबत टिका केली आहे. सुहाना सध्या शिक्षण घेत आहे. ती बॉलिवूडशी निगडीत कोणत्या प्रोजेक्टचाही भाग नाही. तरी सुहाना 'वोग इंडिया' सारख्या प्रतिष्ठीत मासिकासाठी फोटोशूट करते म्हणजे तिने असं काय मिळवलं आहे? असं म्हणून सुहानाला इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर दिल्या जाणाऱ्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. 

करण जोहरचं धर्मा प्रोडक्शन सुहाना खानला लवकरच बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याचं बोललं जात आहे. गौरी खाननेही मुलगी सुहानाचे फोटो शेअर करत वोग मासिकाचे आभार मानले आहे.
 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahrukh Khans Daughter Suhana Khan Debut From Vogue Cover Page