शालू वहिनीला जायचंय सलमान खान सोबत डेटवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

बॉलीवूडबद्दल प्रत्येक कलाकाराला प्रेम असते. तसेच बॉलीवूड स्टार्सची क्रेझ देखील सर्वांमध्ये तितकीच असते. झी मराठीवरील हम तो तेरे आशिक है या मालिकेतील शालिनी अर्थात माधवी निमकर रील लाईप्रमाणेच ग्लॅमरस आहे. या मालिकेत तिची भूमिका स्टायलिश अशी दाखवण्यात आली आहे. 

खऱ्या आयुष्यातही ती काहीशी तशीच आहे. माधवीला तिच्या आवडत्या अभिनेता आणि अभिनेत्रीबद्दल विचारलं असता तिने अमीर खान आणि माधुरी दिक्षित यांची नावं घेतली पण तिला ड्रीम डेट बद्दल विचारले असता ती म्हणाली, 'मला एकदा तरी सलमान खान सोबत डेटवर जायचं आहे.' त्यामुळे छोट्या पडद्यावरील शालू वहिनी मोस्ट एलिजिबल बॅचलर आणि सर्वांचा लाडका अभिनेता सलमान खानची खूप मोठी फॅन असल्याचं कळतं.

सलमान खानप्रमाणेच माधवी देखील रिअल लाईफमध्ये फिटनेसचं वेड आहे. मालिकेत देखील तिची शालू वहिनी ही व्यक्तीरेखा फिट राहण्यासाठी झुंबा डान्स करते आणि त्याची कार्यशाळा देखील घेते. पण माधवी खऱ्या आयुष्यात फिट राहण्यासाठी नियमित योगा करते. माधवीच्या फिट राहण्यामध्ये योगविद्येचे मोलाचे योगदान असून ती तिच्या सोशल मिडीया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोत तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shalu wants to go on date with salman khan