चिन्मय उदगीरकर : शंकर महाराजांची भूमिका मी साकारणार ही निव्वळ अफवा..

शंकर महाराजांची भूमिका कोण साकारणार याबाबत चिन्मयने उलगडा केला आहे.
shankar maharaj fame marathi actor chinmay udgirkar exclusive interview in sakal podcast
shankar maharaj fame marathi actor chinmay udgirkar exclusive interview in sakal podcast sakal

chinmay udgirkar : मालिका विश्वातून घराघरात पोहोचलेला अभिनेता चिन्मय उदगीकर आता निर्माता म्हणून आपल्या भेटीला आला आहे. कलर्स मराठी (colors marathi) वरील 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेची निर्मिती त्याने केली आहे. चिन्मयने केवळ मालिकाच नाही तर चित्रपट आणि वेबसिरिज मध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ही मालिका होण्यामागे शंकर महाराजांची कृपा आहे असे चिन्मय मानतो. सध्या शंकर महाराजांची भूमिका कोण साकारणार यावरून मोठी चर्चा रंगली आहे. चिन्मयच ही भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. पण 'सकाळ' ला दिलेल्या मुलाखातीत त्याने याला साफ नकार दिला आहे. (shankar maharaj fame marathi actor chinmay udgirkar exclusive interview in sakal podcast)

shankar maharaj fame marathi actor chinmay udgirkar exclusive interview in sakal podcast
'जय शंभू नारायण..' अरुण गवळी, मुंबईचा थरार आणि 'दगडी चाळ २' लवकरच..

शंकर महाराजांची भूमिका चिन्मय करणार याची जवळजवळ खात्रीच अनेकांना वाटत होती. पण आता हे सर्व चित्र पालटले आहे. 'सकाळ पॉडकास्ट'मध्ये चिन्मयने याबाबत मोठा खुलासा केला आहे. चिन्मय म्हणाला, 'महाराजांची भूमिका कोण करणार हा कळीचा मुद्दा आहे. माझ्या नावाबाबत बाहेर ज्या चर्चा सुरू त्यात कोणतेही तथ्य नाही. महाराजांच्या बाल भूमिकेसाठी आरुष जसा अचानक आमच्याकडे आला तसंच काहीसं होईल असा माझा विश्वास आहे. ही भूमिका कोण साकारणार याबाबत कसलीही चर्चा अजून नाही, अगदी माझ्या नावाबाबत स्वतः मी देखील विचार केला नाही,' असं चिन्मय म्हणाला. तर शंकर महाराजांची भूमिका कोण साकारणार, हा निर्णय कुणाच्या हातात आहे हे मात्र त्याने या मुलाखतीत सांगितले आहे. ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण मुलाखत ऐका.

केवळ शंकर महाराजांची भूमिकाच नाही तर अभिनेता ते निर्माता होण्यापर्यंतचा प्रवास आणि मनोरंजन विश्वाविश्वातील अनेक गोष्टींवर चिन्मयने 'सकाळ अनप्लग' मध्ये दिलखुलास संवाद साधला आहे. अनेक गुपितं त्याने या मुलाखतीत उलगडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com