esakal | 'आई कुठे काय करते' मालिकेत अनिरुद्ध देशमुखच्या भावाची होणार एंट्री
sakal

बोलून बातमी शोधा

shantanu moghe

'आई कुठे काय करते' मालिकेत अनिरुद्ध देशमुखच्या भावाची होणार एंट्री

sakal_logo
By
स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ Aai Kuthe Kay Karte ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत लवकरच अनिरुद्ध देशमुखचा भाऊ म्हणजेच अविनाश देशमुखची एन्ट्री होणार आहे. मालिकेत आजवर या पात्राविषयी आपण ऐकत आलोय. पण आता अविनाश देशमुखांच्या घरात दाखल होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता शंतनू मोघे Shantanu Moghe अविनाश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. (shantanu moghe to play aniruddha deshmukhs brother role in aai kuthe kay karte slv92)

या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना शंतनू म्हणाला, "आई कुठे काय करते मालिकेचा मी मोठा चाहता आहे. माझ्या घरातल्या सर्वांचीच ही आवडती मालिका आहे. त्यामुळे या मालिकेत काम करायला मिळणं हे प्रचंड मोठं भाग्य आहे असं मला वाटतं. मालिकेची टीम अतिशय भन्नाट आहे. या टीममध्ये मी जरी नवा असलो तरी मला तसं कुणी जाणवू दिलं नाही. खूप प्रेमाने माझं स्वागत झालं. आई कुठे काय करते मालिकेची ही स्वप्नवत टीम आहे. सुजाण कलाकार, उत्कृष्ट संवादलेखन आणि तितक्याच ताकदीचं दिग्दर्शन यामुळे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. अविनाश या व्यक्तिरेखेबद्दल सांगायचं तर १५ वर्षांपूर्वी त्याने देशमुखांचं घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. वैचारिक मतभेदांमुळेच अविनाशने हा निर्णय घेतला. मात्र आता हसतं खेळतं कुटुंब दुभंगणार हे कळल्यावर त्याची पावलं पुन्हा एकदा घराकडे वळली आहेत. या मालिकेच्या निमित्ताने एका छान कलाकृतीचा भाग होण्याची संधी मिळाल्याची भावना शंतनू मोघेने व्यक्त केली."

हेही वाचा: सुयश ते शशांक; दुसऱ्यांदा प्रेमात पडले मराठी कलाकार

आई कुठे काय करते मालिका सध्या भावनिक वळणावर आहे. अनिरुद्ध अरुंधतीच्या नात्याची वीण उसवल्यामुळे सध्या देशमुख कुटुंबाला मानसिक आधाराची गरज आहे. अविनाश कुटुंबाचा आधार होईल का? त्याच्या येण्याने मालिकेत नेमकं कोणतं वळण येणार हे पुढील भागांमधून स्पष्ट होईल. ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.

loading image