Sharad Kelkar : आता त्याच्या 'आवाजा'शिवाय 'डबिंगचं' पान हलत नाही! साऊथच्या चित्रपटांमध्ये मिळतेय सर्वाधिक पसंती

अभिनय बरोबरच आवाजानंही आपल्या नावाची वेगळी ओळख मनोरंजन क्षेत्रात शरदनं निर्माण केली आहे.
Sharad Kelkar stammering became the voice of Prabhas
Sharad Kelkar stammering became the voice of Prabhas esakal

Sharad Kelkar stammering became the voice of Prabhas : प्रसिद्ध अभिनेता शरद केळकरनं त्याच्या अभिनयाबरोबरच आवाजाचीही मोठी क्रेझ तयार केली आहे. साऊथमध्ये तर त्याच्या आवाजाचे मोठे चाहते आहेत. आदिपुरुषमध्ये त्यानं प्रभाससाठी डबिंग केलं होतं. ते लोकप्रिय झाले होते. त्यापूर्वी राजामौली यांच्या आरआऱआर चित्रपटासाठी देखील शरदच्या आवाजानं प्रेक्षकांना जिंकून घेतले होते.

अभिनय बरोबरच आवाजानंही आपल्या नावाची वेगळी ओळख मनोरंजन क्षेत्रात शरदनं निर्माण केली आहे. बाहूबलीमध्ये प्रभासच्या आवाजाचे डबिंग शरदनं केलं होतं. त्याची तर जोरदार क्रेझ तयार झाली होती. त्यानं तान्हाजी द अनसंग वॉरिअरमध्ये केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकाही चाहत्यांच्या कौतुकाचा विषय होती. त्याच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्यानं तेलुगू चित्रपट सालार साठी देखील डबिंग केलं होतं.

शरद बाबत एक गोष्ट फार कमी जणांना माहिती असेल ती म्हणजे तो लहानपणी त्याला बोलताना खूप अडचणी यायच्या. त्यामुळे त्याला बोलताना मोठी मेहनत करावी लागत असे. त्यानं जेव्हा अभिनयाला सुरुवात केली तेव्हा देखील त्याला बोलताना अडचणींचा सामना करावा लागला होता. असेही त्यानं एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

शरद म्हणतो, मी कधीही अभिनेता होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. त्यामुळे व्हाईस आर्टिस्ट होणं ही खूपच दुरची गोष्ट होती. आता मी जेव्हा माझ्या प्रवासाकडे पाहतो तेव्हा बाहुबली, आदिपुरुष आणि सालारमधील डबिंगमध्ये माझा मोठा सहभाग आहे. साऊथच्या डबिंगविषयी शरदनं म्हटलं की, साऊथमधील चित्रपटांमध्ये मी काही फारसं काम केलेलं नाही. हॉलीवूडमध्ये देखील काम केलेलं नाही. ती करण्याची इच्छा आहे.

प्रेक्षकांनी आता व्हाईस आर्टिस्टला ओळखण्यास सुरुवात केली आहे.त्यांची दखल घेतली गेली आहे. म्हणून तर पुष्पा मध्ये श्रेयस तळपडेनं केलेलं डबिंग असो किंवा केजीएफमध्ये सचिन गोळेनं दिलेला आवाज असो हे सगळं लोकांना कमालीचं आवडलेलं दिसत आहे. माझ्यातील बदलाला बाहुबलीची मोठी साथ मिळालेली दिसते. दुसरी गोष्ट म्हणजे बाहुबलीनं व्हाईस आर्टिस्टला लोकं ओळखू लागले. असेही शरदनं त्या मुलाखतीमध्ये सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com